ArtCasteCivilisationCommentaryCompetitionConversationCultureDemocracyDissent/ProtestEconomyEducationEntrepreneurshipEqualityExperiment(ation)FashionFeminismFilms/MoviesFreedomGeographyGovernmentHistoryHumourIdeologyIndiaInsightInternationalJoy/HappinessJusticeLeadershipMediaMedicineMilitancyMilitaryMinoritiesMoneyMusicNationalismNewsNostalgiaPoliticsPowerRegulation/LawReligionRepublic of IndiaScienceSecularismSexSocietySportTechnologyViolenceWar/ConflictZeitgeist

My independence day radio interview.

Introduction (and an apology): I was invited by BIG FM 95MHz to speak on the 1950s and 1960s in the ongoing celebration of 75 years of Indian independence (Azadi ka Amrit Kaal). Being ill-prepared (I am not a historian), I took a week to read up and write down (using Google Transliteration) what I intended to speak. Sangram, the interviewer, of course, very kindly supplied me with some guidelines and sample questions, which I attempted to answer in my replies with the help of the notes I prepared beforehand.

Please excuse the quality of Marathi writing below. There are a LOT of errors (no seriously it is embarrassing), both grammatical, spelling, as well as all kinds of syntax, punctuation, and perhaps even in very fundamental meanings of words I use.

Kindly forgive them, since (1) Marathi is not my first language, despite being my mother tongue, (2) these are written on an online tool rapidly, and (3) only meant to provide me with cues while answering the questions, and not ideally to read by themselves.

The notes are for the 1950s first, followed by the recordings. And then, the 1960s notes, followed in turn, by the recordings of those.

I invite you to listen to the recordings (minus the interviewer. advertisements, or songs) below my notes here.

<Begin 1950s Notes>

एकोणीसशे पन्नासाव्या दशकाच्या भारतात आपण एक कोरा करकरीत देश आहोत ह्याची जाणीव सर्वांना होती. नवं रक्त, नवी आव्हानं, नवीन काहीतरी करण्याची इच्छा, आणि धडपड. सगळीकडे एक चेतना होती, जागृती होती, आणि मनापासून आपल्याला जगाला काहीतरी सिद्ध करायचं आहे ह्याची तळमळ होती. We wanted to prove ourselves to the world. १९४५ आणि १९६० च्या दरम्यान जवळ-जवळ ३ डझन देशांना परकीय सत्तेकडून (म्हणजेच युरोपियन साम्राज्यवादी महाशक्तींकडून) स्वातंत्र्य मिळाले. ५०च्या दशकात महायुद्ध संपून फार काळ गेला नव्हता, म्हणजे त्याचे पडसाद आणि युद्धाबद्दल तिरस्कार ही होता, पण तरी काही काळ उलटून गेल्यामुळे, युद्धात बळी गेलेल्या पिढ्यांबद्दल वैराग्य आणि दुःख लोप पावत चालले होतं आणि युद्ध संपल्याचा आनंद, एक प्रकारचा उल्हास आणि उत्साह कायम होता. भारतातच नव्हे, पण जगात सुद्धा काहीतरी नवं असल्याची, करण्याची, आणि होण्याची एका प्रकारे चढाओढ लागली होती. आपण त्याला अपवाद नव्हतो.

————–

भारत प्रजासत्ताक होण्याच्या एक दिवस अगोदर, म्हणजेच २५ जानेवारी १९५० ला, आपण निवडणूक आयोगाची स्थापना केली. आपला उद्देश साफ होता: सार्वत्रिक मताधिकार. आपण दास्यत्व (colonial mindset) झुगारले आहे ह्याची पावती म्हणजे Universal Adult Suffrage. गम्मत म्हणजे १९२८ मध्येच मोतीलाल नेहरूंच्या नेतृत्वखाली जो Nehru Report तयार करण्यात आला होता, त्यात आपण Universal Suffrage हे गृहीतच धरले होते. तरीदेखील १९३५ च्या आपल्यावर लादला गेलेल्या Government of India Act मध्ये ते आपल्याला दिले गेले नाही कारण आपल्या तेव्ह्नाच्या राजकर्त्यांचा मते: ‘assuming adult suffrage’ would be ‘impracticable at present’, as well as ‘administratively unmanageable’. म्हणूनच निवडणूक आयोगाची स्थापना आणि सार्वत्रिक मताधिकाराची स्वीकृती ही आपल्याला आपण इंग्रजी हुकूमशाहीच्या बेड्यांमधून पूर्णपणे मुक्त झालो आहोत ह्याचा एक संकेत होता.

१९५० मध्ये भारताने स्वतःला प्रजासत्ताक घोषित केले. १९५१-५२ मध्ये आपली पहिली निवडणूक झाली. १९५१ मध्ये पहिले आशियायी खेळ (Asian Games) झाले. त्यावेळेस आपल्याला विश्वात Third World Leader होण्याचा आशा होत्या, आणि नेहरूंचा तेवढा दबदबा सुद्धा होता. इथे भारतात सुद्धा समजोन परिवर्तनाच्या अनुषंगाने अनेक महत्वाच्या अशा घटनादुरुस्त्या आणि कायदे बनविले गेले. पहिल्या सात घटनादुरुस्त्या आणि त्यात महत्वाच्या दोन: पहिली, ज्यात Schedule ९ चा समावेश करण्यात आला, ही घटनादुरुस्ती, १९५१ जी जमीनदारी निर्मुलन आणि कायदा व सुव्यवस्था ठेवण्यासाठी अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि मालमत्ता अधिकारावर निर्बंध आणणारी होती. ह्याचे कारण असे कि दक्षिणेकडे काही कॉम्म्युनिस्टांनी दंगे केले आणि वेग-वेगळ्या हाय कोर्टांनी काही निर्णय असे दिले कि नेहरूंना पटले कि जर भारताला जुन्या पठडीतून काढून पुढे वाटचाल करायची असेल तर जमीनदारांकडील मालमत्ता (म्हणजे जमीन) काढून घेणे आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अमर्यादित, किंबहुना अनियंत्रित अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर अंकुश आणणे जरुरीचे आहे. आणि सातवी घटनादुरुस्ती, १९५६ जिच्यामुळे भाषेच्या आधारावर राज्यनिर्मिती करण्यात आली. ह्याची कथा सुद्धा खूपच रोचक आहे.

एक बाब लक्ष्यात ठेवण्यासारखी आहे कि बांगलादेशच्या स्वातंत्र्याची चळवळ हि काही १९७१ मध्ये सुरु नाही झाली. ती ११ मार्च १९४८ मध्येच चालू झाली होती, जेव्हा मोहम्मद अली जिन्नाहंनी पाकिस्तानची राष्ट्रीय व औपचारिक भाषा उर्दू असेल ही घोषणा केली होती. भाषा देश तोडू शकते हे आपल्याला आपल्यासमोर बघायला मिळालं.

पण आपण घटनादुरुस्ती आणि नवीन कायद्यांबद्दल बोलत होतो. १९५०च्या दशकात आंबेडकरांच्या आणि नेहरूंच्या अथक प्रयत्नांनंतर Hindu Code Bill, ज्यात Hindu Marriage Act 1955, Hindu Succession Act 1956, Hindu Minority and Guardianship Act 1956, आणि Hindu Adoptions and Maintenance Act 1956 होते, ते सर्व पार्लिमेंट मध्ये पास होऊन कायदे झाले. त्याउपर The Untouchability (Offences) Act, 1955 (नंतरचा Protection of Civil Rights Act, 1955) हा फार महत्वाचा कायदा Article १७ ला अनुसरून तयार करून पास करण्यात आला. पुढे Scheduled Caste and Scheduled Tribe (Prevention of Atrocities) Act, 1989 हा ह्यातूनच निर्माण झाला. ०६ डिसेंबर १९५६ मध्ये आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणाच्या अगोदर ह्या सर्व तरतुदी कायद्याच्या कोंदणात बसवून देशभर लागू करण्यात आल्या होत्या.

१९४०व्या दशकातच भारतातील संस्थाने हि एक मोठी डोकेदुखी हळू-हळू करून, साम-दाम-दंड-भेद नीती वापरून सरदार वल्लभाई पटेल ह्या लोहपुरुषाने भारतात विलीन करून घेण्याची कामगिरी पार पडली. त्यात त्यांना व्ही पि मेनन ह्यांची साथ होती. १९४७ मध्ये भारतात ५६२ संस्थाने होती. १९४९ पर्यंत ती सर्व खालसा होऊन प्रजासत्ताक भारतात विलीन झाली होती. त्यात जवळपास सगळी महत्वाची संस्थाने, म्हणजे जुनागढ, हैदराबाद, जम्मू-काश्मीर, त्रावणकोर, जोधपूर, व भोपाळ हि ५०च्या दशकाच्या अगोदरच भारतात विलीन झाली होती. १५ डिसेंबर १९५०ला पेटेल गेले. परंतु, ज्या कामाला त्यांनी तडीस नेले, ते फक्त तेच करू शकले असते. आज जर भारत हा एक देश आहे आणि शेकडो छोटी-छोटी संस्थाने नाहीत, तर त्याचे श्रेय केवळ लोहपुरुष सरदार वल्लभाई पटेल यांनाच आहे यात वादच नाही. राहता राहिले फ्रेंच आणि पोर्तुगीज भाग, आणि नंतर, म्हणजे अगदी १९७५ साली, भारतात आलेले सिक्कीम. पण १९५० पर्यंत, भारताच्या सार्वभौमिकतेला कुठेही संस्थानांकडून आव्हान नव्हतं. हो, बऱ्याच ठिकाणी अजूनही फुटीरतावादी आंदोलनं आणि चळवळी चालू होत्या, पण त्या तर काय आज सुद्धा आहेत.

————–

५०च्या दशकात जगात काय परिस्थिती होती? महायुद्धानंतर झपाझप आर्थिक प्रगती आणि सामाजिक उलथापालथ होत होती. युरोप व अमेरिकेत ह्यामुळे लोकसंख्येमध्ये जलद वाढ झाली (Baby Boomer Generation). समतावाद (Communism) आणि भांडवलशाही (Capitalism) मधले वैचारिक युद्धाचे रूपांतर शीत युद्धामध्ये झाले. अमेरिका आणि सोविएत रशिया ह्यांचे दोन चमू तयार झाले. NATO (०४ एप्रिल १९४५), व त्याविरुद्ध Warsaw Pact (१४ मे १९५५) ह्यामध्ये एक चढाओढ सुरु झाली. नंतर, ह्याचे रूपांतर कोरिया च्या युद्धात (२५ जुने १९५० – २७ जुलै ५३) झाले, सुएझ कालव्याच्या राष्ट्रीयीकरणात (२९ ऑक्टोबर – ०७ नोव्हेंबर १९५६) झाले, क्युबा च्या मिसाईल क्रायसिस (१६ – २८ ऑक्टोबर १९६२) मध्ये झाले, व्हिएतनाम च्या युद्धात (०१ नोव्हेंबर १९५५ – ३० एप्रिल १९७५) झाले, अणुबॉम्ब शर्यतीत (०६-०९ ऑगस्ट १९४५, Hiroshima-Nagasaki – १९ नोव्हेंबर १९९०, Conventional Armed Forces in Europe (CFE) Treaty), तर अंतराळ शर्यतिचा (०२ ऑगस्ट १९५५ Announcements to launch satellites by USA and USSR – ३१ डिसेंबर १९९१ Dissolution of the USSR) सुद्धा उगम ह्याच शीत युद्धात आहे.

ह्याव्यतिरिक्त अल्जेरियाचा स्वातंत्र्यसंग्राम (१९५४-१९६२), अरब-इस्रायली संघर्ष आणि ताण-तणाव, क्युबाची कम्युनिस्ट क्रांती (१९५३-१९५९), त्यात फिडेल कॅस्ट्रो आणि चे ग्वेवारा चा उदय, हंगेरीअन क्रांती (१९५६) (जी सोविएत रशियानी चिरडली, आणि भारताची स्वातंत्र्यप्रेमी, महाशक्तीविरोधी परराष्ट्रीय नीती जरा डगमगली), १९५७ची Treaty of Rome, जिच्या अंतर्गत European Common Market ची स्थापना झाली (नंतरचे EU), साऊथ आफ्रिकेचा Group Areas Act (०७ जुलै १९५०) ज्यामुळे Apartheid (१९४८-१९९१) ला औपचारिक मान्यता मिळाली, नेपाळमध्ये (१९५१) क्रांती होऊन राणा परिवाराची हुकूमशाही संपवून लोकशाही आली, इजिप्तमध्ये नासिर आणि त्यांच्या Free Officers नि मिळून सत्तापरिवर्तन (१८ जुने १९५३) घडवून आणले, आणि पाच राष्ट्राध्यक्षांनी (Nehru, Gamel Abdel Nasser (Egyptian Pres), Joseph Broz Tito (Yugoslav Pres), Kwame Nkrumah (Ghanian Pres), Sukarno (Indonesian Pres). It was called ‘Conference of Heads of States or Governments of Non-Aligned Countries’. 25 countries (all from Asia and Africa, except Cuba, Yugoslavia, and Cyprus) attended. 3 (Bolivia, Brazil, Ecuador) were observers) मिळून दोन्ही महासत्तांशी सामंतर आणि तटस्थतेची भूमिका घेऊन NAM (०१-०६ सप्टेंबर १९६१, बेलग्रेड) स्थापित केली. अनेक देशांना स्वातंत्र्य मिळाले, काहींना रक्तपात होऊन, आणि काहींना कंटाळून. एकूण १९५०चे दशक राजकीय द्रिष्टया बरेच घटनपूर्ण होते.

१९५० आणि १९६०व्या दशकात पाकिस्तानला भारतातून मुसलमानांचे व तिथून इथे हिंदूंचे देशांतर चालूच राहिले. पाकिस्तानमध्ये कराची तर भारतात मुंबई हि विस्थापितांची पसंतीची शहरं. त्यांच्याबरोबर त्यांचे विचार, आचार, भाषा, खाणे, संस्कृती, सर्व काही आले. आणि त्यांचे प्रॉब्लेम्स सुद्धा. ८ एप्रिल १९५० रोजी लियाकत अली खान, पाकिस्तानचे पंतप्रधान, आणि जवाहरलाल नेहरू, ह्यांचात करार झाला. ह्या अंतर्गत एकमेकांच्या देशातले अल्पसंख्याक आणि त्यांच्याबद्दलची धोरणे ठरवण्यात आली, आणि पुन्हा युद्ध होणार नाही ह्याची हमी देण्यात अली. शरणार्थी आणि निर्वासितांच्या अडचणी आणि त्यांचे निवारण वगैरे मुद्दे ह्यात आहेत. परंतु, २ वर्षांपूर्वी (११ सप्टेंबर १९४८) मोहम्मद अली जिन्नाहंचे अकाली निधन आणि त्यानंतरचे विस्कळीत राजकारण हे पाकिस्तानला (आणि आपल्याला सुद्धा) आजही सोसायला लागत आहे. १९५६च्या राजघटनेनंतर (पाकिस्तान मध्ये तीन वेळा Constitution लिहिण्यात आले आहे: १९५६, १९६२, १९७३), पाकिस्तानचे पहिले राष्ट्रपती इस्कंदर अली मिर्झा झाले. ह्यांचाही काही गमती सांगतो: ह्यांचे पूर्वज म्हणजे मीर जाफर (होय तेच, १७५७च्या पलाशी युद्धात ज्यांनी सिराज-उद-दौलाशी गद्दारी करून रॉबर्ट कलाइव्हला आणि इंग्रजांना विजय मिळवून दिला, तेच). दुसरी गम्मत ही कि ते इंग्रजी सेनेच्या नोकरीत असतांना, त्यांचे पोस्टिंग Poona Horse मध्ये झाले होते आणि त्यांनी पुण्यात काही काळ वास्तव केले होते. त्यानंतर, ते १९४६मध्ये Joint Defence Secretary of India होते, ज्यामुळे भारतीय सेनेच्या फाळणीचे (म्हणजे पाकिस्तानला काय-काय मिळणार आणि भारतीय सैन्याला काय-काय उरणार वगैरे) काम त्यांच्याकडे होते.

१७ मार्च १९५९ला सर्वोच्च तिब्बती बौद्ध धर्मगुरू, दलाई लामा, ह्यांनी आपल्या चिनी पहारेकर्यांना हुलकावणी देऊन, त्यांच्या तावडीतून निसटून, भारताकडे पळ काढला. ३१ मार्च १९५९ला ते तवांगला पोहोचले आणि त्यांनी भारतात शरण घेतली. त्याच दिवशी, नेहरूंनी लोक सभेत दलाई लामांना सम्मान दिला जाण्याची घोषणा केली आणि उत्तरेत धरमसालामध्ये ‘निर्वासित तिब्बती सरकार’ च्या स्थापनेला परवानगी दिली.

अलास्का आणि हवाई हि दोन राज्य अमेरिकेत सामावून घेतली गेली. सोविएत रशियाचा हुकूमशाह स्टालिन हा ह्रिदयविकाराने गेला (१९५३) आणि निकिता ख्रुश्चेव्हचा उगम झाला, ज्यांने लगेचच स्टालिनला शिव्या देणे आणि सर्व चाकांचे खापर त्याच्यावर फोडण्याचे काम सुरु केले. श्री लंकेत (त्यावेळचे सिलोन) त्यांच्या आवडत्या नेत्याचा (S.W.R.D.Bandaranaike) (२६ सप्टेंबर १९५९) एका बौद्ध भिक्षुने खून केला. त्यानंतर, त्या नेत्याची विधवा, Sirimavo Bandaranaike, पुढची निवडणूक जिंकून जगातली पहिली महिला पंतप्रधान बनल्या (२१ जुलै १९६०). श्री लंकेबरोबर भारताचे संबंध कदाचित रामायणकाळापासून बेताचेच होते. १९५६ साली श्री लंकेत सिंहाला भाषेला प्राथमिकता मिळाली आणि तामिळला दुय्यम दर्जा देण्यात आला. नंतर, १९६०च्या दरम्यान श्री लांकेनी भारताला, ‘तुमचे ८ लाख तामिळ घेऊन जा’ असा इशारा दिला. मच्छिमारांबरीबर लपाछपी, कधी भारतातल्या तामिळ लोकांवर आरोप, ते थेट १९७१च्या युद्धात पाकिस्तानला त्यांची विमाने उतरवून इंधन भरण्याची मदत वगैरे प्रकार श्री लंकेने केले आहेत. नंतर, ८०च्या दशकात, राजीव गांधींच्या कारकिर्दीत, आपण सुद्धा त्यांच्या आंतरिक मामल्यांमध्ये नाक खुपसून त्रास करून घेतला. असो.

तर ५०व्या दशकाच्या शेवटपर्यंत जगाची, भारताची, आणि भारताच्या शेजाऱ्यांची ही वस्तुस्तिथी होती म्हणजे एकंदर.

————–

१९५०च्या दशकात तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पहिला ट्रान्सिस्टर रेडिओ (१९५४), जगातील पहिली-वहिली सौर-उर्जेवर चालणारी बॅटरी (१९५४), Polypropylene (१९५४) (Polyethylene नंतर जगातील सर्वाधिक वापराचे प्लास्टिक, खुर्च्या, डबे, दोरखंड यामध्ये वापरले जाते, सिन्थेटिक कपड्यांमध्ये जास्तीत-जास्त वापर होतो, वगैरे) चे शोध हे महत्वाचे टप्पे होते. पण सर्वात उल्लेखनीय असे तीन शोध १९५०च्या दशकात घडले: MOSFET (Metal-Oxide-Semiconductor Field-Effect Transistor) (नोव्हेंबर १९५९), एक ट्रान्सिस्टर जो शेकडो करोडोचा मोजणीत आज आपल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणाच्या Chip मध्ये आहे, पोलिओ वॅक्सीन, जे १९५५मध्ये जोनस सौल्क ह्या वैज्ञानिकाने शोधले (आणि ज्यांनी ते पेटंट करण्यास नकार दिला, कारण त्यांना ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचे होते, त्यांना १९७५चा जवाहरलाल नेहरू पुरस्कार व १९७६मध्ये American Humanist Association ने Humanist of the Year पुरस्कार मिळाला), आणि ०४ ऑक्टोबर १९५७ला तर सोविएत रशियाने कमालाच केली: एक ८३ किलो वजनाचे अंतराळयान Sputnik ह्याचे थेट Low Earth Orbit मध्ये प्रक्षेपण केले. अमेरिकेने लगेचच Explorer 1 पुढच्या ४ महिन्यातच (०१ फेब्रुवारी १९५८) लाँच केले. पण गम्मत म्हणजे, अमेरिकन प्रशासन आणि अमेरिकन लोकं इतके घाबरले ह्या Sputnik च्या लाँच मुळे, कि त्यांचा राष्ट्राध्यक्षांनी त्यांच्या Department of Defense च्या अंतर्गत एक Advanced Research Projects Agency (ARPA) ची (०७ फेब्रुवारी १९५८) आणि NASAची (२९ जुलै १९५८) स्थापना केली. पुढे जाऊन ह्याच ARPA एजेन्सीने सोविएत रशियाने जर अमेरिकेवर अणुबॉम्ब हल्ला केलाच तर राष्ट्राध्यक्षांना राजवट चालवण्यास दळणवळणासाठी एक शक्कल काढली, जिचं नाव होतं ARPANET. ह्यालाच आज आपण Internet म्हणून ओळखतो. आहे कि नाही गम्मत?

विज्ञानाच्या क्षेत्रात आपण पोलिओ वॅक्सीन आणि जोनस सौल्क बद्दल बोललोच आहोत. पण त्याच्याएवढा, किंबहुना त्याहूनही महत्वाचा मनुष्यजातीवर long-term परिणाम असणारा शोध (१९५३) म्हणजे DNA च्या Double Helix रचनेचा. DNA ह्याचा शोध १८६९ मध्येच लागला होता, आणि त्याचा अनुवांशिकतेवरचा परिणाम हा १९४३ पासूनच माहित होते. पण हा DNA नक्की कसा दिसतो ह्याचं गुपित James Watson आणि Francis Crick ह्या शास्त्रज्ञांनी उघडले. त्यातही काही वाद आहेत, कारण असे उघडकीस आले कि त्यांनी त्या कार्यात असणाऱ्या Rosalind Franklin ह्यांचे काही संशोधन चोरले पण त्या बाई असल्यामुळे Nobel पारितोषिक फक्त दोघेही पुरुष घेऊन गेले. असो.

विज्ञानात बायकांच्या योगदानबद्दलच बोलत असलो तर अजून एक उदाहरण सांगतो १९५०च्या दशकातले. एक महत्वाची वैज्ञानिक घटना १९५१मध्ये घडली, आणि ती अशी कि मनुष्याच्या शरीराबाहेर पहिल्यांदा human cervical cancer cells तयार करण्यास वैज्ञानिकांना यश आले. ज्या बाईंच्या शरीरातून हे पहिले काढले, त्यांचे नाव होते Henrietta Lacks. त्या Cell Culture चे नाव ठेवले HeLa Cells. जोनस सौल्क ने हेच सेल्स वापरले पोलिओ वॅक्सीन निर्मितीसाठी. आणि आजही हेच Cell Culture जगातले असंख्य वैज्ञानिक आपल्या संशोधनासाठी वापरतात.

————–

आता आपण वळूया क्रीडाक्षेत्राकडे. जगात पहिली Formula 1 शर्यत १३ मे १९५०ला इंग्लंड मध्ये Silverstone ला झाली. १९५२च्या हेलसिंकी ऑलिम्पिक मध्ये भारताने नेदर्लंड्सला हॉकी final मध्ये ६-१ असे हरवले (२४ जून) आणि पाचव्यांदा सुवर्णपदक मिळवले (हेच परत, १९५६च्या मेलबर्न ऑलिम्पिक मध्ये पाकिस्तानवर १-० चा विजय मिळवून, पुन्हा सुवर्णपदक कमावले). आणि कुस्तीत Men’s Freestyle Bantamweight मध्ये महाराष्ट्राच्या खाशाबा जाधवांने कांस्यपदक जिंकले! ऑलिम्पिक खेळात स्वतंत्र भारताचे वैयक्तिक पदक मिळवणारे हे पहिले व्यक्ती. त्यानंतर थेट १९९६पर्यंत, तब्बल ४४ वर्षानंतर जेव्हा महाराष्ट्राच्याच लिएंडर पेस ने टेनिस मध्ये अटलांटाला कांस्यपदक मिळवले, तोपर्यंत Individual medal जिंकणारे हे एकुलते एकच. क्रिकेट मध्ये १९५०चे दशक पॉली उम्रीगर (२५२० रन, ४६ मॅच, ७ सेन्चुरी, २२३ टॉप स्कोर), विजय मांजरेकर (१६८२ रन, ३५ मॅच, ४ सेन्चुरी, १७७ टॉप स्कोर), पंकज रॉय (२२८० रन, ४२ मॅच, ४ सेन्चुरी, १७३ टॉप स्कोर), विनू मंकड (१५३६ रन, ३३ मॅच, ३ सेन्चुरी, २३१ टॉप स्कोर, १२२ विकेट), व विजय हजारे (२१९२ रन, ३० मॅच, ७ सेन्चुरी, १६४ टॉप स्कोर), अशा लोकांनी गाजवले. लाला अमरनाथ आणि विजय मर्चन्ट ह्यांचा अस्त झाला होता आणि दशक संपेपर्यंत पुण्याचा चंदू बोर्डे हा एक उमदा खेळाडू भारताला लाभला होता.

फुटबॉल जगताला सुद्धा एक अत्यंत तेजस्वी असा तारा १९५८च्या वर्ल्ड कप मध्ये लाभला. ब्राझिलकडून फायनल मध्ये ५५व्या आणि ९०व्या मिनिटात २ गोल करून ब्राझीलच्या स्वीडनवरील ५-२ विजयात वाघाची कामगिरी बजावणारा एक १७ वर्षाचा मुलगा होता: एड्सन आरंत्स द नासिमेंतो. अर्थात पेले.

————–

संगीतक्षेत्रात १९५०चं दशक भरपूर नावीन्यपूर्णक ठरलं. पाशात्य संगीतात सुरुवातीला जरी १९४०च्या दशकातल्या शैली वरच भर देण्यात आला, आणि Frank Sinatra, Dean Martin, आणि Nat King Cole सारखे गायक लोकप्रिय राहिले, तरी लवकरच Elvis Presley, Chuck Berry, Little Richard, James Brown, आणि Buddy Holly सारख्या कलाकारांनी पुढे येणं सुरु केलं. त्यानंतर Jerry Lee Lewis, The Everly Brothers, आणि Johnny Cash ह्यांचा संगीताला चलन मिळाले. त्याचबरोबर Dizzy Gillespie, Miles Davis, John Coltrane, Dave Brubeck, Ella Fitzgerald, Ray Charles, Dinah Washington, Nina Simone, आणि Billie Holiday सारखे कलाकार उदयास आले. तुम्ही Don McLean’s चे १९७२चे “American Pie” ऐकले आहे का? ते ०३ फेब्रुवारी १९५९ला झालेल्या एका विमान अपघातात म्रित्युमुखी पडलेल्या Buddy Holly, Ritchie Valens आणि J. P. “The Big Bopper” Richardson च्या निधनावर व Elvis Presley च्या सैन्येत भरती होण्यावर आधारित गाणं आहे. इतका परिणाम आहे १९५०च्या दशकाचा पाश्चात्य संगीतावर.

————–

सिनेमा सुद्धा १९५०च्या दशकात खूप समृद्ध झाला. पश्चिमेकडे Federico Fellini, Ingmar Bergman, Claude Chabrol, आणि Jean Cocteau सारखे दिग्दर्शक गाजवत होते, तर पूर्वेकडे दोन दिग्गज उदयाला आले: Akira Kurosawa व सत्यजीत रे. कुरोसावा ह्यांचे Rashomon, Ikiru, आणि Seven Samurai, आणि रे ह्यांची अपू ट्रिलॉजि ह्या अजरामर कलाकृत्या आहेत आणि आजही होतकरू (आणि जाणकार सुद्धा) कथाकार हे सिनिमे पाहतात आणि त्यातून वेग-वेगळ्या पैलूंची परिपूर्ती होते.

पण फक्त आर्ट फिल्म्सच ५०व्या दशकात नाही बनल्या. काही अप्रतिम व्यावसायिक फिल्म्स सुद्धा आल्या. पश्चिमेकडे Alfred Hitchcock सारख्या दिग्दर्शकांनी Strangers on a Train, Dial M for Murder, Rear Window, To Catch a Thief, The Man Who Knew Too Much, Vertigo, आणि North by Northwest सारख्या एकाहून एक चित्रपट, तर मोठ्या स्टुडिओंनी Sunset Boulevard, Singin’ in the Rain, Stalag 17, The Ten Commandments, Bridge on the River Kwai, On the Waterfront, House of Wax, The Day the Earth Stood Still, The War of the Worlds, A Star is Born, 12 Angry Men, All About Eve, Some Like It Hot, Roman Holiday, A Streetcar Named Desire, आणि Ben Hur सारखे चित्रपट बनविले तर पूर्वेकडे Godzilla हा सुद्धा १९५१ मध्ये प्रदर्शित झाला. डिस्नी चा पहिला सुपरहिट सिनेमा (डिस्नी हे दिवाळखोरीच्या विचारात असतांना) Cinderella १९५०मध्ये पडद्यावर आला.

————–

आपल्याकडे तर १९५०चे दशक हे हिंदी चित्रपटसृष्टीचे सुवर्णयुग म्हणून आजही ओळखलं जातं. एक-एक तारा इतका चमचमणारा कि बघणाऱ्याचे डोळे दीपावे: Dilip Kumar, Raj Kapoor, Dev Anand, Nargis, Meena Kumari, Madhubala, Vyjayanthimala, Nutan, Waheeda Rehman, Kishore Kumar, Guru Dutt, वाह. जशी काय भारताची फाळणी हे एक समुद्रमंथन होते, आणि त्या रक्तरंजित विषयाबरोबर हे हिरेही तिथूनच प्रकट झाले. Mother India ला ऑस्कर नॉमिनेशन मिळाले, ‘जागते रहो’ नी Karlovy Vary मध्ये, तर ‘दो बीघा जमीन’ नी Cannes ला पुरस्कार पटकावले. आणि ‘आवारा’ नी तर चक्क रशियाला प्रेमात पाडले. Bimal Roy, Guru Dutt, B R Chopra, V Shantaram, Mehboob Khan सारखे अव्वल दिग्दर्शकांनी एकामागाहून एक अप्रतिम चित्रपट काढले. मी फक्त काही नावं घेतो: बाबुल, आवारा, बाज़ी, बैजू बावरा, परिणिता, बूट पॉलिश, श्री ४२०, जागते रहो, दो बीघा जमीन, Mr & Mrs ५५, झनक झनक पायल बाजे, देवदास, CID, Mother India, प्यासा, नया दौर, दो आँखें बारह हाथ, चलती का नाम गाडी, मधुमती, कागज के फूल, अनाडी, असे अगणित सुंदर सिनिमे. अन त्यावर झालर म्हणजे Anil Biswas, Naushad, C.Ramchandra, S.D.Burman, Vasant Desai, Shankar-Jaikishan, Madan Mohan, O.P.Nayyar, आणि Salil Chaudhury सारखे गुणी संगीतकारांना Geeta Roy-Dutt, Suraiya, Shamshad Begum, Rajkumari, Lata Mangeshkar, Asha Bhosle, Mohd. Rafi, Mukesh, Talat Mahmood, Manna Dey, Hemant Kumar आणि Kishore Kumar ची साथ. १९५०चे दशक खरोखरीचा सुवर्णकाळ होता.

एक अजून गम्मत सांगतो. १९५२मध्ये आपले नवे Information and Broadcasting (I&B) Minister, पुण्याचे बाळकृष्ण विश्वनाथ केसकर ह्यांनी चित्रपट संगीत, क्रिकेट कौमेंटरी, आणि पेटी ह्यावर आकाशवाणीत बंदी आणली. का? त्यांच्या विचारात शास्त्रीय संगीतच नव्या भारताला ऐकण्याजोगे होते! पण चित्रपट संगीत हे इतके लोकप्रिय होते कि श्री लंकेतल्या Radio Ceylon ने बिनाका गीतमालेला (आणि अमीन सयानीला) जन्म दिला. आणि मुंबईत जाहिरात घेण्यासाठी कार्यालय काढलं!. असंख्य भारतीयांनी (आणि जाहिरातदारांनी) या स्टेशनला उचलून धरलं. शेवटी, नाईलाजानं आकाशवाणीने १९५७ साली विविध भारतीचे उद्घाटन केलं.

————–

१९५०च्या दशकाच्या पूर्वार्धात कलाक्षेत्रात जगभर जर एका बाजूने Abstract Expressionismची (जी अमेरिकन कलाकारांची पॅरिसला तोडून न्यू यॉर्क ला कलेचे केंद्र आणण्याची धडपड होती), ज्याचे पुरस्कर्ते Jackson Pollock आणि Willem de Kooning सारखी व्यक्तिमत्वे होती, तर उत्तरार्धात Color Field शैलीतली चित्रकला, ज्यामागे Barnett Newman आणि Mark Rothko सारखे कलाकार होते, आणि Pop Art, ज्याचे सर्वात विख्यात कलाकार Andy Warholचा ठसा १९६०व्या दशकापासून आजपर्यंतच्या कलेत आणि जाहिरात क्षेत्रात जगात सुद्धा उमटलेला आहे. भारतात १९४७मध्ये मुंबईत स्थापित केलेला Progressive Artists’ Group (PAG), ज्याचे स्थापनाकर होते F. N. Souza, S. H. Raza, M. F. Husain, K. H. Ara, H. A. Gade, आणि S. K. Bakre (शिल्पकार), ह्यामध्ये नवीन रक्ताची भर पडली: Vasudeo S. Gaitonde, Bhanu Athaiya, Krishen Khanna, आणि Mohan Samant. परंतु Souza आणि Raza ह्यांनी देश सोडला, आणि Bakre सुद्धा PAG सोडून गेले. त्यामुळे १९५६ साली, PAG बंद करण्यात आला. अर्थात, जे कलाकार PAG ने भारताला दिले, त्यांचे काम हे भारतीय कलेला नवीन दिशा देणारे होते.

————–

आता आपण थोडे महाराष्ट्राकडे बघूया. १९५०च्या शतकात महाराष्ट्रच नव्हता, पण बॉम्बे राज्य होते. १९२०मध्ये नागपुरात झालेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या वेळी भाषेवर प्रांतरचेनेचा मुद्दा गांधींनी मान्य केला होता. लोकमान्य टिळकांचाही ह्याला पाठिंबा होता. पण स्वातंत्र्यानंतर मात्र नेहरुंना अशी प्रांतरचना संकुचित व राष्ट्रीय एकात्मकतेला धोका असलेली वाटू लागली. मुंबईतील उद्योगपतींचा, जे मुख्यत: अमहाराष्ट्रीय होते, मुंबई महाराष्ट्राला द्यायला कडाडून विरोध होता. १९४६च्या साहित्य संमेलनात ‘संयुक्त महाराष्ट्र समिती’ स्थापन झाली व संयुक्त महाराष्ट्राची मागणी करणारे तीन ठराव साहित्यकांनी पाठवले ज्याला राजकीय नेत्यांनी पाठिंबा दिला. महाराष्ट्रातील डाव्या पक्षांचा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त महाराष्ट्र चळ्वळीला पाठिंबा होता. २८ नोव्हेंबर १९४९ रोजी मुंबई महापालिकेत मुंबईसह महाराष्ट्राचा पहिला ठराव आचार्य अत्रे व डॉ. आर.डी. भंडारे यांनी ‘शेडयुल्ड कास्ट फेडरेशन’च्या वतीने मांडला. १९५२मध्ये पोट्टी श्रीरामल्लू ह्या गांधीवादी सत्याग्रहिने ६३ दिवस उपोषण करून बलिदान दिल्यामुळे आंध्र प्रदेशची निर्मिती ०१ ऑक्टोबर १९५३ला झाली. त्याआधी बसविलेल्या States Reorganisation Commissionच्या अहवालामध्ये संयुक्त महाराष्ट्र आणि वेगळा गुजरात ह्याची मागणी फेटाळून लावण्यात आली. या आयोगाच्या विरोधात महाराष्ट्रभर असंतोष निर्माण झाला. नेहरूंनी त्यामुळे सौराष्ट्रासह गुजरात, विदर्भासह महाराष्ट्र व स्वतंत्र मुंबई अशी त्रिराज्य योजना जाहीर केली. परंतु मुंबई-विना महाराष्ट्र हे काही कोणी ऐकून घ्यायला तयार नव्हते. सेनापती बापट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, एस.एम.जोशी, प्रल्हाद केशव अत्रे, श्रीपाद डांगे, शाहीर अमर शेख, भाई उद्धवराव पाटील, प्रबोधनकार ठाकरे ह्यांनी चळवळीचे नेतृत्व केले. अत्र्यांनी आपल्या ‘मराठा’ या दैनिकातून व भाषणांतून संयुक्त महाराष्ट्राचा जोरदार पुरस्कार केला तर विरोधकांवर टीका केली. शाहीर अमर शेख, शाहिर अण्णाभाऊ साठे, शाहिर गव्हाणकर ह्यांनी आपल्या कलाविष्काराने मराठी अस्मिता जागृत ठेवली. २० नोव्हेंबर १९५५ ला मोरारजी देसाई आणि स का पाटीलांनी चौपाटीवर जाहीर सभा घेतली. त्यामुळे २१ नोव्हेंबरला पडसाद आंदोलनामध्ये उमटले, आंदोलनकर्त्यांवर गोळीबार झाला, आणि १५ आंदोनकारी मेले. फेब्रुवारी १९५६ मध्ये केंद्र सरकारने मुंबईला केंद्रशासित करार दिले आणि परत एकदा महाराष्ट्रात संतापाची लहर उठली. ८० हुतात्मे पोलीस गोळीबारात ठार झाले. भारताचे अर्थमंत्री सी.डी देशमुखांनी महाराष्ट्रावरील होणाऱ्या अन्यायाच्या निषेधार्थ आपला राजीनामा दिला. नेहरूंना कधी नव्हे ते काळ्या झेंड्यांना सामोरं जावं लागलं. १९५७ची लोक सभा आणि विधान सभा निवडणूक संयुक्त महाराष्ट्र समितीनी काँग्रेसविरुद्ध लढविली, आणि डॉ. आर.डी. भंडारेंच्या नेपथ्याखाली प्रमुख विरोधी पक्ष बनली. शेवटी, असे म्हणतात कि इंदिरा गाधींने नेहरूंचे मन वळवले. आणि ०१ मी १९६० रोजी यशवंतराव चव्हाणांना मुख्यमंत्रीपदाची शपथ देऊन महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली.

इथून आपण १९६०च्या दशकाकडे वळूया.

<End 1950s Notes>

<Begin 1960s Notes>

जरी आपण महाराष्ट्राच्या स्थापनेपासून ६०च्या दशकाचा श्रीगणेशा केला असेल आपल्या चर्चेत, तरी खरं बघायला गेलास, संग्राम, तर हे दशक भारताला फार काही लाभलं नाही.

म्हणजे:
पानशेतचे धरण फुटून (१२ जुलै १९६१) १,०००वर लोकांनी प्राण गमावले
चीनबरोबर युद्ध झाले (१९६२) + चीनबरोबर सीमेवर चकमकी घडल्या (१९६७)
पाकिस्तानबरोबर युद्ध झाले (१९६५)

दोन वर्ष गव्हाचे पीक फसले (१९६४-६५, १९६५-६६), आपल्याला अमेरिकेकडे भीक मागायला लागली PL ४८० च्या अंतर्गत गहू व कडधान्ये अमेरिकेकडून घ्यायला लागली

हिंदीभाषेविरुद्ध आंदोलन, आणि त्यात मृत्यू, झाले (१९६५)
धनबादमध्ये खाण कोसळून २७४ कामगार मेले (१९६५)
भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच, आणि सुदैवाने अखेरच्यावेळीस वायू सेनेने आपल्याच हद्दीत आपल्याच लोकांवर ऎझोल मिझोराम मध्ये बॉम्बहल्ला केला (१९६६)
कोयनानगरच्या भूकंपात १८० बळी तर तीन हजारवर जखमी झाले (१९६७)
नक्षलवादाची सुरुवात (१९६७)
किळवेनमणी (तामिळ नाडू) मध्ये ४४ दलितांना जीवे जाळले (१९६८)

नेहरू गेले (१९६४) – हा खूप मोठा फटका होता भारताला
लाल बहादूर शास्त्री गेले (१९६६)
होमी भाभांचा विमान अपघातात मृत्यू झाला (१९६६)
सेनापती बापट गेले (१९६७)
मधुबाला वारली (१९६९)
आचार्य अत्रे आणि अण्णाभाऊ साठे, संयुक्त महाराष्ट्राचे दोन खंबे आधारस्तंभ गेले (१९६९)

दशक संपेपर्यंत भारत, आणि महाराष्ट्र, अगदी वेगळा दिसायला लागला होता.

बाकीही काही दुःखद घटना घडल्या:
रामगोपाल वर्मांचा जन्म झाला (१९६२)
नवज्योत सिंग सिद्धूचा जन्म (१९६३)
अक्षय कुमारचा जन्म (१९६७)
फेमिना मिस इंडिया ची स्थापना (१९६५)
मनोज ‘भारत’ कुमारचे हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण झाले. त्यांचा पहिला चित्रपट १९५७चा ‘Fashion’ आपटला, पण दुसरा, १९५८चा ‘सहारा’… सुद्धा पडला! त्यानंतर त्यांचा तिसरा ‘पंचायत’ चौथा ‘चांद’ पाचवा ‘हनिमून’ सहावा ‘कांच कि गुडिया’ सातवा ‘प्यार मिलन कि आस’ आठवा ‘सुहाग सिंदूर’ नउवा ‘रेशमी रूमल’ हे सुद्धा फ्लॉप होते. असो. संग्राम, मी गम्मत करतोय बरं का? नंतर त्यांनी काही सुपरहिट सिनेमे दिले: ‘वो कौन थी?’ ‘शहीद’ ‘पत्थर के सनम’ ‘उपकार’ ‘परब और पश्चिम’ ‘रोटी कापड और मकान’ ‘क्रांती’ असे देशप्रेमाने ओथंबलेल्या कलाकृत्या देऊन २००४ मध्ये बाकी सिनेकलाकारांच्या कितीतरी अगोदर दूरदृष्टी ठेवून राजकारणात भाजप मध्ये आले.

पण jokes apart, १९६०चे दशक हे काही कारणांमुळे भारतासाठी आणि महाराष्ट्रासाठी लाभदायी सुद्धा ठरले:

१९४७मध्ये जेंव्हा आपण स्वतंत्र झालो, तेंव्हा आपली साक्षरता फक्त १२% एवढी होती. आणि आयुर्मान (म्हणजेच life expectancy) हे अवघे ४०.५३, म्हणजे ४१ वर्ष्याच्या खाली! आपल्याला ताबडतोब ह्या दोन कमतरतांचा उपायन शोधायचा होता आणि लागूही करायचा होता.

सन ५१ पासून ते ६१ पर्यंत पहिल्या पाच Indian Institutes of Technology ची स्थापना झाली होती, १९५६मध्ये AIIMS ची, आणि १९६१मध्ये पहिल्या दोन Indian Institutes of Management ची स्थापना कलकत्त्यात आणि अहमदाबादमध्ये झाली. तसेच १९६१सालीच National Institute of Design ची स्थापना सुद्धा अहमदाबाद मध्ये झाली.

उत्तरेकडे हरित क्रांती झाली आणि भारत धान्याच्या बाबतीत बराच आत्मनिर्भर झाला. ६०व्या दशकात, चंदेरी क्रांती (Dr BV Rao, अर्थात Venkys चे संस्थापक, ज्यांना Father of poultry farming in India असं ओळखलं जातं) म्हणजेच कुक्कुटपालनाची सुसरुवात आणि जलद वाढ, ज्यामुळे अवघ्या ९ वर्षात आपण poultry मध्ये जगात तिसऱ्या क्रमांक पटकावला. नंतर, १९७०च्या दशकात पश्चिमेकडे, म्हणजे गुजरातपासून श्वेत क्रांती, किंवा Operation Flood झाले.
महाराष्ट्रात कॉपरेटिव्ह पद्धतीने साखर उत्पादनाची सुरुवात झाली. नंतर ह्याच कॉपरेटिव्ह चळवळीचं महाराष्ट्राच्या राजनीतीलासुद्धा खूप योगदान आहेच. तसच अणुउर्जेतून वीज निर्मिती हीसुद्धा तारापूर ऍटोमिक पॉवर स्टेशन च्या २८ ऑक्टोबर १९६९मधल्या उदघाटनानंतर भारतात चालू झाली. ऑगस्ट १९६३मध्ये Aeronautics India Limited (AIL) (ज्याचे नंतर Hindustan Aeronautics Limited मध्ये विनलीनीकरण करण्यात आलं) ची स्थापना भारत सरकारनं केली आणि भारतीय बनावटीची पहिली MiG-२१ विमाने भारतीय वायू सेनेत रुजू झाली.

सतत युद्धामुळे, किंवा युद्धसदृश्य परिस्थितींमुळे आपल्या सैन्यामध्ये एका प्रकारची तयारी, practice म्हण, अशी झाली. आपल्याला किती सैनिक कुठे लागतात, किती दारुगोळा लागतो, कुठे व किती वाहने आणि रणगाडे, विमानं आणि बोटी पाहिजेत, वगैरेचा अंदाज आपल्याला लागला. आपल्या राजदूतांना आणि मुत्सद्द्यांना आपल्यासमोर आव्हान आल्यावर कुठले देश आपल्याबरोब उभे असतात आणि कुठले आपल्याविरुद्ध, वगैरे वगैरे. ह्यामुळेच हरित क्रांती, श्वेत क्रांती, आत्मनिर्भरता, आणि ७०च्या दशकात १९७१ च्या युद्धात दणदणीत विजय व १९७४चा Smiling Buddha अणुबॉम्ब चाचणी, हे सर्व आपल्याला लाभलं असं म्हणायला हरकत नाही.

तर ह्या झाल्या भारतातल्या आणि महाराष्ट्राटाल्या घडामोडी १९६०च्या दशकातल्या. आता आपण बघूया जगात काय चाललं होतं.

———————————————————

६०चं दशक आपल्याला, म्हणजेच भारतीयांना आणि महाराष्ट्रीयांना जरी फार लाभलं नाही, तरी जगात मात्र हे दशक खूप घटनात्मक असं होतं, बरं का?

आंतरराष्ट्रीय पातळीवर, १९६०चे दशक हे व्हिएतनामच्या युद्धाचे आणि युद्धविरोधी प्रदर्शनाचे, जॉन एफ केनेडी चे आणि काटकारस्थानांचे, बीटल्स चे आणि रोलिंग स्टोन्स चे, अपोलो ११ चे आणि नील आर्मस्ट्राँगच्या One Small Step For Man A Giant Leap For Mankind चे, माओ झेडॉंग च्या The Great Leap Forward आणि Cultural Revolution चे आणि चीन व फ्रान्स च्या अणुचाचण्यांचे, बर्लिन वॉल चे आणि शीत युद्धाचे, मार्टिन लुथर किंग जुनिअर च्या I Have A Dream भाषणाचे आणि मोहम्मद अलीच्या बंडखोरीचे, अमेरिकेत कृष्णाकांतीच्या लोकांच्या संघर्षाचे आणि आफ्रिकन देशांच्या स्वातंत्र्याचे, यूरोपच्या अस्ताचे आणि अमेरिकेच्या उदयाचे, सत्तापालट आणि सैनिक शासनाचे आणि अणुबॉम्ब ने सज्ज मिसाईल चे, लोकशाही उत्क्रांतीचे आणि समतावादाच्या क्रांतीचे, राजनीतिक हत्यांचे आणि निसर्गाच्या प्रकोपाचे, आणि हे दशक म्हणजे रॉक अँड रोल चे, मिनी सकिर्टसचे, एल एस डी चे, लैंगिक क्रांती चे. म्हणजेच sex, drugs, and rock & roll चे असे म्हणायला हरकत नाही.

आपल्याकडे मात्र ह्याचा गंध मात्र नव्हता, हि खंत का हे आपलं नशीब हे सांगणं कठीण आहे.

फक्त एका क्षेत्रात मात्र आपल्याला १९६०चं Counterculture, म्हणजे युरोप आणि अमेरिकेत तरुणांनी जुन्या परंपरा, रूढी, आणि संस्कृती झुगारून, उपभोगवादी (materialist किंवा consumerist) प्रकृतींना झिडकारून जी समाजाला आणि कलेला एक नवीन दिशा देण्याचा प्रयत्न केला, त्याचे पडसाद उठले. आणि ते म्हणजे कला. जरी १९६०मध्ये मुघल-ए-आझम (ज्याला १५ वर्षे लागली) आणि चौदवीं का चांद प्रदर्शित झाले, तरी १९६१मध्ये शम्मी कपूरचा जंगली, १९६६मध्ये तिसरी मंझिल, आणि १९६७मध्ये देव आनंदचा ज्वेल थीफ हे टेकनीकलर सिनेमे आणि त्यांचे नवीन पिढीतले संगीतकार, R D Burman, Kalyanji-Anandji आणि Lakshmikant-Pyarelal ह्यांनी ६०चं आंतरराष्ट्रीय Counterculture भारतात आणलं. मराठी रंगमंचावर आणि सिनेमात १९६०च्या दशकानं जाता-जाता आपल्याला दादा कोंडके (विच्छा माझी पुरी करा हे नाटक आणि नंतर भालजी पेंढारकरांचे तांबडी माती, १९६९, ज्यामध्ये दादांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला), निळू फुले (सुरुवात स्टेज वर कथा अकलेच्या कांद्याची पासून, पहिली फिल्म एक गाव बारा भानगडी १९६८), डॉक्टर श्रीराम लागू (कानिटकरांचं इथे ओशाळला मृत्यू ह्या नाटकापासून ते त्यांचे सर्वात गाजलेलं पात्र: कुसुमाग्रजांचं नटसम्राट), व अशोक सराफ, Ramesh Deo, Seema Deo, Raja Paranjpe, Raja Gosavi, Sharad Talwalkar वगैरे असे अनेक कलाकार आणि अप्रतिम नट देऊन गेलं.

अजून एक गम्मत सांगतो. हि खरी मागच्या, म्हणजे ५०च्या दशकातली आहे. पण ती इथे सांगायला हवी. १५ सप्टेंबर १९५९ला दूरदर्शनचा जन्म झाला होता. आणि लगेचच पंडित जवाहरलाल नेहरूंची पहिली मुलाखतहि दूरदर्शनवरून प्रसारित करण्यात आली. तुला माहित आहे का, संग्राम, हे मुलाखत घेणारे कोण होते? अरे, दुसरे-तिसरे कोणी नव्हे तर चक्क पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे. आपले, पु ल!

१९३७पासूनच पुलं नभोवाणीत होते. नंतर, १९५५मध्ये त्यांना आकाशवाणीत नोकरी लागली. त्यांच्या बटाट्याची चाळ ह्या कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. १९५८मध्ये पुलंना आकाशवाणीने युनेस्कोच्या शिष्यवृत्तीवर मीडिया ऑफ मास कम्युनिकेशन या अभ्यासक्रमासाठी लंडनला बीबीसीकडे पाठवले. ह्यावरही त्यांनी लिहिलेलं पुस्तक प्रचंड गाजले. १९५९मध्ये पु.ल. देशपांडे भारतातील पहिले दूरचित्रवाणी कार्यक्रम निर्माते झाले. दिल्ली दूरदर्शनवर सुरू झाले त्यावेळचा पहिला कार्यक्रम पुलंनी निर्मिला होता. दूरदर्शनवरील बिरजू महाराजांच्या नृत्याचा कार्यक्रम होता. तबला वाजवून पुलंनी आपले तबला प्रावीण्य दाखवून दिले. असे आपले महाराष्ट्राचे पु ल देशपांडे. असो.

त्यावेळचे शास्त्रीय संगीतातले दिग्गज म्हणजे पंडित भीमसेन जोशी, रवी शंकर, गंगुबाई हंगल, बिस्मिल्लाह खान, उस्ताद अल्लाहरखा, एम एस सुब्बुलक्ष्मी, हरिप्रसाद चौरासिया, एम बालमुरलीकृष्ण, शिव कुमार शर्मा, अमजद अली खान, अली अकबर खान, पंडित जसराज, आणि असेच अनेक जागतिक कीर्तीचे गायक, वादक, आणि नर्तक, जसे आनंद शंकर, बिरजू महाराज, मृणालिनी साराभाई अश्यांनी १९५०, ६०, आणि ७०ची दशके, आणि पुढेही, गाजवली.

संग्राम, तू भिसेनजींचं मिया कि मल्हार ऐकल्यास का?बाहेर मुसळधार पाऊस, ढगांचं गडगडणे, विजांचे चमकणं, गरमागरम चहा, आणि पंडितजींचा आवाज! अहाहाहाहा!

अरे, एक गम्मत सांगायची राहूनच गेली. जुन १९६६मध्ये लंडनच्या हॅम्पस्टेडमध्ये बीटल्सचा George Harrison हा पंडित रवी शंकरांना भेटला. आणि प्रेमात पडला. ती कथा सुद्धा खूपच इंटरेस्टिंग आहे. नंतर george रवी शंकरांकडून सतार शिकला आणि त्या वाद्याचा प्रभाव बीटल्सच्या नंतरच्या संगीतात ऐकायला मिळतो.

बरं तर बाकी कलाक्षेत्रात काय-काय घडत होतं? पाश्चात्य सिनेमात स्टुडिओ सिस्टिम बारगळली आणि जवळ-जवळ संपली. नवीन, countercultural सिनेमे येऊ लागले. त्याला American New Wave किंवा Hollywood Renaissance असे नाव पडले. ह्यात स्टुडिओला मागे सारून चित्रपटाचा दिग्दर्शक हा जास्त महत्वाचा ठरला. Woody Allen, Francis Ford Coppola, Brian De Palma, Stanley Kubrick, Roman Polanski, Sydney Pollack, George Lucas, Martin Scorsese, Ridley Scott, Steven Spielberg, Wes Craven, सारखे अव्वल दिग्दर्शक आणि पटकथाकार ह्यांनी हॉललीवूडला ह्याअगोदर जमल्या नसत्या अश्या एकाहून एक कलाकृत्या पडद्यावर आणल्या: Who’s Afraid of Virginia Woolf?, Bonnie and Clyde, The Graduate, The Dirty Dozen, Don’t Look Back, 2001: A Space Odyssey, Breakfast at Tiffany’s, Cleopatra, The Dirty Dozen, Doctor Zhivago, Guess Who’s Coming to Dinner, How the West Was Won, The Italian Job, It’s a Mad, Mad, Mad, Mad World, The Jungle Book, Lawrence of Arabia, The Longest Day, Mary Poppins, My Fair Lady, The Pink Panther, One Hundred and One Dalmatians, Planet of the Apes, Psycho, Romeo and Juliet, Rosemary’s Baby, The Sound of Music, Spartacus, To Kill a Mockingbird, Valley of the Dolls, West Side Story, Dr. Strangelove, Easy Rider, Midnight Cowboy (आतापर्यंत एकुलती एक Best Picture चा Oscar जिंकणारी X-rated फिल्म), Butch Cassidy and the Sundance Kid, Dr. No (पहिला James Bond, त्यात Sean Connery होता), Goldfinger आणि बर्याच अजून.

ह्याच काळात tv वर Star Trek, The Dean Martin Show, Batman, The Dick Van Dyke Show, The Tonight Show, Gilligan’s Island, Mission: Impossible, The Flintstones, The Lucy Show, Bewitched आणि I Dream of Jeannie सारखे अप्रतिम कार्यक्रम यायला लागले.

यूरोपमध्ये हीच वेळ French New Wave सिनेमाची होती. ह्यामध्ये जुने पुराणे टाकून देऊन experimental सिनेमा, ज्यात editing, visual style, आणि narrative हे नव्या दृष्टिकोनातून बघितले गेले. ह्या वेळचा बराच सिनेमा हा iconoclastic, म्हणजे कुठल्याच व्यक्ती, गोष्ट, किंवा कल्पनेचे सोयरसुतक किंवा पावित्र्याची पर्वा न करता त्याकडे बघणे, असा होता. ह्यात Jean-Luc Godard, François Truffaut, Claude Chabrol, Alain Resnais, Henri Colpi, Jacques Demy, Jean-Pierre Melville, सारखे दिग्दर्शक तर Brigitte Bardot, Jeanne Moreau, Gerard Blain, Bernadette Lafont, सारखे कलाकार शामिल होते. जाणकार असं म्हणतात कि हि लाट चित्रपटाच्या इतिहासातील सर्वात influential अशी होती.

त्याच दशकात, म्हणजे साठीतच, Iranian New Wave सिनेमाची सुद्धा सुरुवात झाली, १९६४मध्ये Hajir Darioushची दुसरी फिल्म Serpent’s Skin जी D.H. Lawrenceच्या Lady Chatterley’s Loverवर आधारित होती. आज इराणी सिनेमाला जगात स्थान आहे ते या दशकातल्या कथाकारांमुळे.

तसेच Japanese New Wave, English New Wave, आणि New German Cinama ह्या सुद्धा सगळ्या त्याच वेळेस घडल्या. गम्मत म्हणजे New Indian Cinema किंवा Parallel Cinema, जो बंगालवरून १९४० आणि ५०च्या दशकांत सुरु झाला, तो French New Waveच्या कितीतरी अगोदर झाला. त्यात Satyajit Ray, Mrinal Sen, Ritwik Ghatak, Tapan Sinha, Khwaja Ahmad Abbas, Buddhadeb Dasgupta, Chetan Anand, Guru Dutt, आणि V. Shantaram, आणि नंतर y Shyam Benegal, Mrinal Sen, Adoor Gopalakrishnan, G. Aravindan, आणि Girish Kasaravalli सारखे निर्देशक होते. वास्तववाद आणि त्यावेळच्या प्रचलित असे सामाजिक बाबींवर टीका हे ह्याचे सव्वारूप होते.

१९६०च्या दशकाचा शेवट हा porn फिल्म्स साठी सुद्धा खूप महत्वाचं ठरलं. लैंगिक क्रांतीमुळे कामुक पण कलात्मक (erotic but tasteful) असे सिनेमे पाहायला मिळाले. डेन्मार्कमध्ये pornography कायदेशीर करार करण्यात आली, अमिरिकन समाज (आणि त्यामुळे, जगात जिथे जिथे अमेरिकन चित्रपट आणि संगीत पोहोचले तिथे) संभोगाच्या बाबतीत मोकळा झाला होता, आणि नवीन तंत्रज्ञानांमुळे मुळे चित्रपट बनविणे, आणि बघण, सोप झाल होत.

हा काळ पार ८०च्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत राहिला.

————————————————-

१९५०चे दशक पाश्चात्य संगीताच्या rock & roll क्रांतीचे होते, तर १९६०चे दशक हे त्याच्या पराकाष्ठेचे, आणि उताराचे होते. संगीतात आता लोकांना अर्थ पाहिजे होता. युद्धविरोधी आणि सामाजिक विषय त्यातन त्यांना ऐकायचे होते. Bob Dylan, Bob Dylan, Joan Baez, Pete Seeger, आणि Harry Belafonte गायक, वादक, संगीतकार, आणि beatles, doors , आणि pink floyd सारखे बँड हे नुसते संगीत आणि ठेका नव्हे तर अर्थपुर्ण काव्य घेऊन पुढे आले. गिटारच्या बादशाह, jimi hendrix चा उदय हा ६०च्या दशकात झाला. त्याच्या Are You Experienced ह्या अल्बम मधील Purple Haze आणि Hey Joe ह्या गाण्यांनी जगाला jimi hendrix च्या जादूगारीबरोबर प्रेमात पाडलं. Motown Records हे लेबल १९६०मध्ये जन्माला आलं. motor आणि town हे डेट्रॉईट शहराचला उद्देशून, motown हे नाव. ह्या एकट्या लॅबेलने पाशात्य सुगम संगीताच्या इतिहासात बरेच काही केलं…जॅक्सन ५, जिथून नंतर Micheal jackson जगाला मिळाला, हा बंद motown records चाच. aretha franklin , stevie wonder, smokey robinson, ray charles, diana ross, james brown, luther vandross हे सर्व कलाकार motown चेच. ह्या लेबल चे महत्व असं, कि हे कृष्णकांतीच्या लोकांनी स्थापित केलेले, कृष्णकांतीच्या लोकांनी चालवलेलं, आणि कृष्णकांतीच्या कलाकारांना पुढे आणण्यासाठीची हि पहिली कंपनी होती. black-owned, black-run, black-centered.

अजून ह्या क्षेत्रात काय-काय बार चालले होत बघूया: beatles अमेरिकेत पहिल्यांदाच फेब्रुवारी १९६४मध्ये आले. ह्या काळाला The British Invasion असे म्हंटले आहे. ऑक्टोबर १९६३पासून ते जवळपास १९६७ संपेपर्यंत Beatles, the Rolling Stones, the Zombies, the Kinks, Small Faces, the Dave Clark Five, Herman’s Hermits, the Hollies, the Animals, Gerry and the Pacemakers, the Searchers, the Yardbirds (ह्याच बंद मधून नंतर Led Zepplin आलं.), the Who, असे एकाहून एक बाँड्स आणि गायक, म्हणजे Dusty Springfield, Cilla Black, Petula Clark, Tom Jones, आणि Donovan असे इंग्रजी कलाकारांनी अमेरिकेला, आणि त्यामुळे जगाला, मंत्रमुग्ध केलं.

Beatles चा Sgt. Pepper’s Lonely Hearts Club Band हा अत्यंत लोकप्रिय आणि २०व्य शतकातल्या पाश्चात्य संगीतात एक महत्वाचा टप्पा मानला जाणारा अल्बम हा १९६७मध्ये प्रकाशित झाला.

ह्यावेळच्या फॅशन मध्येसुद्धा मॅक्सि आणि मिनी वगैरेचा समावेश होता. मिडी हा पोशाख १९७० मध्ये आला. लंडनमधे चालू झालेली हि फॅशन क्रांती होती modern फॅशन ची, जिला थोडक्यात नाव देण्यात आले, Mod. म्हणजे तुम्हला आठवत असेल भारतात अगदी सत्तरी आणि ऐशीच्या दशकापर्यंत, पाश्चात्य पोशाखाला mod असं म्हणायचे. ते इथून आलं.

जागतिक संगीतात, ६०व्य दशकाचा शेवट एका नेत्रदीपक अश्या सोहळ्यानि झाला: Woodstock.

————————————

न्यू यॉर्क पाशी Bethel नावाच्या एका खेड्यात Max Yasgur ह्या व्यक्तीच्या dairy farmमध्ये १५ ते १८ ऑगस्ट १९६९ला हे फेस्टिवल, ह्याला मराठीत जर आपण उत्सव किंवा महोत्सव म्हंटलं तर ह्याचे खरं रूप कळणार नाही. म्हणून Festival. भारतातल्या कुंभ मेल्यासारखं काहीतरी. संयोजकांना वाटले होते २५-एक हजार लोक येतील, आणि त्यांनी १८ आणि २४ डॉलरची तिकिटे विकली. परंतु ४.५ लाख लोक अली, सगळ्या योजना सगळे तयारी सगळं planning फसलं आणि हे festival हे विनामूल्य आहे हि घोषणा करण्याच्या आताच ते विनामूल्य झालं.

इथे कुठल्या कुठल्या दिगज्जांनी हजेरी लावली ह्याची यादी मी देतो. जशे एखाद्या अत्यंत प्रतिभावान कलाकाराकडे किंवा कलाकृतीकडे बघून जसे डोळे दीपावेत, तसे नुसती ही यादी ऐकून संग्राम ऐकणार्याच्या कान दीपतील: Creedence Clearwater Revival, ज्यांनी पहिल्यांदा ह्यावर आम्ही येऊ अशी हमी दिली होती (अर्थात दहा हजार डॉलर घेऊन) त्यांना पोलिसांनीच अडवले आणि पहिल्या दिवसाच्या पहिल्या प्रयोगासाठी त्यांना पोहोचताच आलं नाही. त्यामुळे ते मध्यरात्रीपर्यंत पोहोचले आणि लागेचच मंचावर गेले. त्याआधी, Richie Havens festival चा श्रीगणेशा करून चुकला होता. त्यानंतर Swami Satchidananda हे विख्यात योग्य गुरु मंचावर आले. भगव्या वस्त्रात त्यांनी विवेकानंदांना स्मरून ‘Brothers and Sisters of America’ अशी सुरुवात करताच टाळ्यांचा नुसता गडगडाट झाला. त्यांनी संगीतात कसे ब्रह्माण्ड लपले आहे वगैरे तत्सम अध्यात्मावर काहीतरी बोलले आणि ‘Hari Om … Rama Rama’ म्हणून festival चे उद्घाटन केले. हे माहित होतं का तुला, संग्राम? आपल्याला उगीचच वाटतं एखाद्या चलचित्र वाहिनी वर कोणीतरी भगवी वस्त्र नेसून योग करून दाखवणार्याच कौतुक. पण हे ज्या शाळेत आहेत, त्याचे प्रिन्सिपॉल असे हे Swami Satchidananda Woodstock चे उद्घाटन करायला गेले होते. बोल!

अजून कोण-कोण बरं होतं? Sweetwater, Bert Sommer, Tim Hardin, आणि त्यानंतर आपले पंडित Ravi Shankar, ज्यांनी भर पावसात, बाकीच्या बाँड्स नि वाजवण्यास नकार दिल्यावरही आपल्या सतारच्या जोरावर लोकांना मंत्रमुग्ध करुवून जागेवर खिळवून ठेवलं. त्यानंतर Melanie, Arlo Guthrie, Joan Baez.

दुसऱ्या दिवशी Quill, Country Joe McDonald, Carlos Santana, John Sebastian, जो कि वास्तविक कार्यक्रमात नव्हता, पण जे वाजवणारे होते ते येईपर्यंत ह्या पट्ठ्यानी मंच गाजवला, आणि लोकप्रियता मिळवली, Keef Hartley Band, The Incredible String Band, Canned Heat, Mountain, Grateful Dead, Creedence Clearwater Revival, Janis Joplin, Sly and the Family Stone, The Who, Abbie Hoffman, Jefferson Airplane.

आणि शेवटच्या दिवशी: Joe Cocker and The Grease Band, Country Joe and the Fish, Ten Years After, The Band, Johnny Winter, Blood, Sweat & Tears, Crosby, Stills, Nash & Young, Paul Butterfield Blues Band, Sha Na Na, आणि अखेरीस Jimi Hendrix. हे असे ना भूतो ना भविष्यती festival पार पडले. आजकालचे coachella वगैरे फिके पडतात.

—————————————

हिंदी चित्रपटसृष्टीत ५० आणि ६०ची दशके जस आपण म्हंटले तसा सुवर्णयुग होता.

आजही आपण मुघल-ए-आझम, बरसात कि रात, चौदावीन का चांद, साहिब, बीबी, और गुलाम, बंदिनी, मेरे मेहबूब, संगम, वक्त (जो पहिला वाहिला multistarcast असा चित्रपट होता), दो रस्ते, आणि guide ची गाणी गातो, आजही आपल्याला काश्मीर कि कली आणि जंगली, ब्रह्मचारी आणि आँखें, हमराज आणि फूल और पथ्थर, तिसरी मंझिल आणि जंगली, बीस साल बाद आणि गुमनाम, पडसन आणि ज्वेल थीफ, राम और श्याम आणि हम दोनो ची गाणी आणि डिआलॉग आठवतात.

तो काळ जसा पश्चिमेकडे अर्थपूर्ण काव्याचा होता तसाच भारतातही होता, किंबहुना पहिल्यापासूनच होता. ह्यानंतर मात्र चित्रपट संगीतातील काव्य हे कुठेतरी लुप्त झालं असा म्हणतात. त्यावेळचे कवी म्हणजे शकील बदायुनी, कैफी आझमी, साहिर लुधियानवी, शैलेंद्र, मजरूह सुलतानपुरी, आनंद बक्षी, निदा फाझली, संपूर्ण सिंग कलर (सॉरी, गुलझार), गोपालदास नीरज हे होते. नुसते चित्रपट आणि पाताठच नव्हे, पण त्याकाळचे कवीही समाजवादी बांधणीतले होते. काही तर थेट कोम्मुनिस्टच. पण त्यामुळे त्यांना लोकांचं दुःख उमजले आणि त्यातून त्यांच्या कलेची निर्मिती झाली असं म्हणायला हरकत नाही. तरीच त्यांची गाणी आपल्याला इतकी अविस्मरणीय आहेत.

६०च्या दशकातल्या कलाक्षेत्रातल्या गोष्टीत एक शेवटची गम्मत सांगून संपवतो: नोव्हेंबर १९६१मध्ये पटनामध्ये, दोन कवींनी, जे भाऊ पण होते, त्यांनी एक साहित्यिक-कलात्मक चळवळ चालू केली, ज्याचं नाव ठेवलं The Hungry Generation. बंगाली साहित्यामध्ये आणि कलेमध्ये आमूलाग्र बदल घडविणारी ह्या चळवळीचे संथपक होते मलय आणि समीर रॉयचौधरी. नंतर, कलकत्त्याला अजून दोघ शामिल झाले: शक्ती चट्टोपाध्याय आणि देबी रॉय. त्यांच्या avant garde (म्हणजे फ्रेंचमध्ये advance guard, थोडक्यात प्रायोगिक, पुरोगामी, आणि रूढी आणि परंपरे च्या विरुद्ध, अर्थात experimental , radical , आणि unorthodox असे लिखाण, काव्य, कला, व्यक्तिमत्व, राहणीमान, बोलणे, किंबहुना वागणे सुद्धा हे समजाने ठरवून दिलेल्या नियमांविरुद्ध, असे होते, आपण त्यांना विद्रोही म्हणू शकतो) अशा या प्रकारच्या कलाकृतीत सहभाग असल्यामुळे त्यांच्या नौकय्रा गेल्या आणि काही काळासाठी कैद सुद्धा झाली. नंतर, ह्या चळवळीत अनेक कलाकार, कवी, लेखक, चित्रकार Patna, Kolkata, उत्तर Bengal, Tripura, Benares अशा ठिकाणांहून सहभागी झाले, जसे, Utpal Kumar Basu, Binoy Majumdar, Sandipan Chattopadhyay, Basudeb Dasgupta, Falguni Roy, Subhash Ghosh, Tridib Mitra, Alo Mitra, Ramananda Chattopadhyay, Anil Karanjai, Karunanidhan Mukhopadhyay, Pradip Choudhuri, Subimal Basak आणि Subo Acharya. ह्या चळवळीवर गांधीवाद आणि Proudhonवाद ह्याचा खूप प्रभाव पडला. आणि ह्या चळवळीचा प्रभाव अमरिकन काव्यावर आणि साहित्यावर नंतर Allen Ginsbergच्या Beat Generation च्या माध्यमातून पडला. १९६१ आणि १९६५ च्या दरम्यान १००वर जाहीरनामा प्रकाशित करून ह्या चळवळीने भारतीय काव्याला आणि सह्त्याला एक नवी दिशा दिली. ह्याचे पडसाद नंतर हानी, मराठी, असामी, आणि उर्दू संहितावर सुद्धा उमटले बरंका?

—————————————————

क्रीडाक्षेत्रात पहिले क्रिकेट बघू. हा काळ भारतीय फिरकी गोलंदाजांचा होता असं म्हणायला हरकत नाही. वेंकटराघवन, महाराष्ट्राचे बापू नाडकर्णी (ज्यांनी एकदा एका पाठोपाठ तब्बल २१.५ मैडेन ओव्हर्स टाकल्या! म्हणजे १३१ बॉल बिना रन देता), चंद्रशेखर, प्रसन्ना, बेदी ह्या दिग्गजांनी ६०वं दशक गाजवल. आपण काही फार जिंकलो नाही. पण त्याकाळी कुणाला फार अपेक्षाही नव्हत्या असं म्हणायला हरकत नाही. रेडिओवर कंमेंटरी (जी १९२७ मध्ये BBC वर पहिल्यांदा प्रसारित झाली, ती १९४०मध्ये भारतात अली होती, आणि एकाच कंमेंटरीकार होता: Bobby Talyarkhan, ज्याचा आवाज बसला कि कंमेंटरी बंद. नंतरच्या दशकात Berry Sarbadhikari आणि Pearson Surita, Dev Raj Puri आणि ‘Vizzy’ (Vizianagram चे महाराजकुमार) ह्यांनी इंग्रजी कंमेंटरी केली. आश्चर्य म्हणजे ह्यात देव राज पुरी सोडून कोणीही क्रिकेट खेळले नव्हते! आपल्याला उगीच वाटते कि हर्ष भोगलेच पहिला! त्यानंतर Dicky Rutnagar आणि Vijay Merchant कंमेंटरी देऊ लागले. साठी आणि सत्तरीच्या दशकात Ravi Chaturvedi, Joga Rao, Jasdev Singh सारख्या हिंदी कंमेंटरीकरांनी खरा हा खेळ गावा-गावात पोहचविला आणि क्रिकेट भारतात लोकप्रिय करण्याचे श्रेय हे खरंतर आपण त्यांना द्यायला हवं. जरी गावस्कर आणि तेंडुलकर आपल्याला शिवाजी पार्कने दिले, महेंद्र सिंग धोनी आणि विराट कोहली हे मात्र पापल्याला ह्या ६० आणि ७०च्या दशकातल्या हिंदी कंमेंटरीकरांची देणगी आहे.

१९६६मध्ये इंग्लंड मध्ये आयोजित केलेल्या FIFA फुटबॉल World Cup मध्ये, लंडनच्या वेम्ब्ले स्टेडियम मध्ये, इंग्लंडच्या राणीसमोर, आणि १ लाख प्रेक्षकांच्या साक्षीनं, इंग्लंडने त्यांचे पहिले, आणि एकुलते एक विजेतेपद मिळविले, आणि ते हि जर्मनीला ४-२ नि हरवून (त्यात जेफ हर्स्ट ची हॅट ट्रिक पण शामिल आहे…जी कुठल्याही FIFA वर्ल्ड कप फायनल मधली एकुलती-एक हॅट ट्रिक आहे). आजही इंग्रज लोकं त्या विजयाबद्दल (आणि विशेषतः जर्मनी विरुद्ध असल्यामुळे) असं बोलतात: ‘Two world wars and one world cup’

हॉकीमध्ये १९६०च्या रोम ऑलिंपिक मध्ये भारताला पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला आणि रौप्य पदकावरच सुख मानावं लागलं. पण ६४च्या टोकियो ऑलिंपिक मध्ये मात्र परत एकदा पाकिस्तनालाच फायनल मध्ये हरवून आपण सुवर्णपदक हस्तगत केलं. १९६८च्या मेक्सिको सिटी ऑलिंपिक मध्ये भारतीय हॉकी संघानी कांस्य पदक मिळवलं. पाकिस्तान सुवर्ण घेऊन गेले. त्यानंतर १९८०पर्यंत आपल्याला एकही पदक गवसला नाही, हॉकी मध्येच काय, पण कुठल्याही खेळात. आणि आपले शेवटचे हॉकी सुवर्ण हे १९८०च्या मॉस्को मधील आहे. त्यानंतर भारतीय हॉकी चा अस्त झाला. पण त्याला उतरती कला हि ६०वव्या शतकातच लागली.

१९६०च्या रोमच्या ऑलिम्पिक मध्येच मिल्खा सिंगने ऑलिम्पिक ट्रॅक रेकॉर्ड ४००मी च्या शर्यतीत फायनल मध्ये तोडले. परंतु, आणि हे The Age वर्तमानपत्रात छापून आले ते वाचून दाखवतो, ‘Milkha Singh is the only Indian to have broken an Olympic track record. Unfortunately, he was the fourth man to do so in the same race’. मिल्खा सिंग, ज्यांना नेहरूंनी पाकिस्तानला जाऊन खेळलात भाग घेण्यासाठी पटवलं होतं, आणि ज्यांना पाकिस्तानच्या राष्ट्रपती, जेनेरल अयुब खान ने ‘Flying Sikh’ असा खिताब बहाल केला होता, त्यांनी ह्या ४००मी च्या शर्यतीत २५०मी वर मागे वळून पहिले, आणि घात झाला. हि कहाणी, मला वाटतं प्रत्येक भारतीयाला पाठ आहे.

संग्राम, काय कोण जाणे, पण आपण भारतीय लोकं ६०च्या दशकातपर्यंत वेगळ्या विचारांचे होतो. आपल्याला एखादी टेस्ट मॅच draw झालेली आठवायची, कारण जिंकणं हे दुर्लभ असायचं. आपल्याला मिल्खा सिंग प्रिय, आणि त्याचे डझनवारी गोल्ड मेडल्स पेक्षा ऑलिंपिक चा पराभव आठवायचा. १९६२ चे चीन बरोबर युद्ध यात रेझान्ग ला च्या लढाईत मरणोपरांत परम वीर चक्र विजेते मेजर शैतान सिंग ह्यांचे त्यांच्या १२३ जवांनांमधून ११४ हुतात्मे (त्यांचे शव जेंव्हा सापडले, ते त्यांच्या एका ऑफिसर कॅप्टन रामचंदर यादव ह्यांनी एका दगडामागे लपवून ठेवले होते, तेंव्हा त्यांच्या हातात त्यांची पिस्तूल होती). आपल्याला जिकायची सवय, आणि आवड, हि १९६५ पासून हळू-हळू लागली. परम वीर हविलदार अब्दुल हमीद यांची कामगिरी (त्यांनी एकट्याने ६ पाकिस्तानी टॅंक उध्वस्त केले आणि त्यांचा हल्ला फसला), १९६७चे नाथू ला (११-१४ सप्टेंबर १९६७) आणि चो ला (१ ऑक्टोबर १९६७) खिंडीच्या चीनबरोबर चकमकी, ज्यात ८८ भारतीय सैनिकांच्या बदल्यात (१६३ जखमी) आपण ३५० चिनी सैनिकांना यमसदनी धाडले (४५० जखमी) आणि ह्या चकमकी निर्णायकपणे जिंकल्या, आणि चिनी ड्रॅगन हा पायामध्ये शेपूट घालून पळाला, आणि नंतर १९७१च्या युद्धात पाकिस्तानचा सपशेल पराभव ह्या काही घटनांनंतर आपला आपल्याकडे बघायचा दृष्टिकोन बदलला असं म्हणायला हरकत नाही. आणि मग जेव्हा ७१ साली सुनील गावस्करचं आगमन झालं, भारत जिंकायला तयारच होता!

—————————————————

आता आपण विज्ञान, तंत्रज्ञान, आणि उद्योगाकडे वळू.

भारतात हरित क्रांतीला सुरुवात झाली. लाल बहादूर शास्त्रींनीं आपल्या पंतप्रधानांच्या बंगल्यामागे ५ एकर वर गहू लावला. तुला माहित आहे का संग्राम, तिथे आता आपल्या गृहमंत्र्यांच्या , म्हणजेच अमितभाई शहांचा बंगला आहे.

ह्या क्रांतीचे जनक होते M. S. Swaminathan, ज्यांना आपण Father of the Indian Green Revolution in असे म्हणतो
Chidambaram Subramaniam, त्यावेळचे food and agriculture minister ज्यांना नंतर Bharat Ratna प्रदान केले गेलं, आणि जे Political Father of the Indian Green Revolution म्हणून ओळखले जातात.
Dilbagh Singh Athwal, Father of Wheat Revolution.
आपल्या पुण्याचे Atmaram Bhairav Joshi सारखे वैज्ञानिक जे Mahatma Phule Krishi Viswavidyalaya, Rahuriचे vice-chancellor होते, आणि Research Advisory Committee of the Indian Agricultural Research Institute चे chairman.
आणि पुसा, बिहार स्थित Indian Agricultural Research Institute (IARI)

ह्यात काय काय आलं? तर नवीन तंत्रज्ञान, high yielding variety (HYV) चे बियाणं, यांत्रिक शेती साधने (tractors, harvesters, drills), नवीन बांध, कालवे, आणि सिंचनपद्धती, आधुनिक कीटकनाशक व खतं. हे सर्व Norman E Borlaugच्या, म्हणजेच Father of the Worldwide Green Revolutionच्या जागतिक हरित क्रांतीचाच एक भाग होता असं म्हणायला हरकत नाही.

ह्या हरित क्रांतीचा परिणाम म्हणजे कडधान्याचे पीक हे ३०च टक्के जास्त जमीन पिकवून तिप्पट झाले! म्हंजे २३०% efficiency – उत्पादनात वाढ. हे सर्व शास्त्रीजी आणि इंदिराजींच्या काळात बरका. शास्त्रीजींच्या ‘जय जवान, जय किसान’ हा नारा खूपच गाजला

१९५७मध्येच बिरलांच्या हिंदुस्थान मोटर्स ह्या कंपनीने एम्बसीडर हि गाडी बाजारात उतरवली होती. तिला Mark १ असं नाव दिल गेल. हि २०१४पर्यंत अशीच अपरिवर्तित राहिली! १९५९मध्ये बजाज ऑटोला भारत सरकारकडून २ व ३ चाकी वहानंनसाठी licence मिळाला आणि १९६०मध्ये Vespa १५० हि स्कूटर बाजारात आणून भारताची स्वावलंबी दुचाकी वाटचाल पुण्यावरून चालू झाली. १९७०पर्यंत बजाज ने १ लाख गाड्या (सर्व मिळून १० वर्षात, बरका) विकल्या होत्या. गेल्या मेच्या महिन्यात, २०२२ मध्ये, एकट्या बजाजने २.५ लाख गाड्या विकल्या! आहे कि नाही प्रगती?

१९ जून १९६१ला नीलकंठ कल्याणींनी मुंबईत भारत फोर्ज ची स्थापना केली. नंतर, ह्या कंपनीने पुण्यात उत्पादनासाठी कारखाने बांधले आणि आज भात फोर्ज हि जगातली सर्वाधिक मोठी अशी single location forging facility आहे, जीमध्ये पूर्णतः स्वयंचलित forging press lines व अत्याधुनिक यंत्रणा आहेत.

१५ फेब्रुवारी १९६१मध्ये पहिल्यांदाच जगात गर्भनिरोधक गोळ्या मिळू लागल्या. ह्या १९५७पासूनच चलनात होत्या परंतु फक्त स्त्रीरोगासाठी. आता कोणीही ह्या वापरू शकतं होत. १९६०च्या दशकातली लैंगिक क्रांती हि ह्यामुळेच होऊ शकली असे म्हणतात.

आरोग्याच्या क्षेत्रात, अजून काय बरं, हो…१९६३मध्ये measles (गोवर) vaccine सर्व चाचण्या संपवून मंजूर झालं. २०००साली अमेरिकेत measles च पूर्णपणे निर्मूलन झालं आहे आणि लवकरच भारतातही होईल.

१९६४मध्ये पुण्याच्या Kirloskar Electricने भारताची पहिली-वहिली DC motor बनविली. आज आपण जेंव्हा विद्युत वाहनांच्या दिशेने २१सव शतकात वेगाने जात आहोत, तेंव्हा आपल्याला लक्ष्यात ठेवले पाहिजे कि हि उडी, भारताततली पहिली DC motorची, किती महत्वाची होती. एक गम्मत सांगू का, संग्राम? किर्लोस्कर हि भारतात पहिलीच कंपनी होती ज्यांनी लोखंडाच्या नांगरांची निर्मिती १९०३मध्ये केली. तेंव्हा लाकडी नांगरापेक्षा लोखंडी नांगर म्हणजे state of the art तंत्रज्ञानाचं प्रतीक होतं! संग्राम, आपण इंग्रजांनी आपल्याला मागासलेलं ठेवले वगैरे असं बोलतो. पण त्याचा खरा प्रत्यय ह्या लोखंडी नांगराच्या गोष्टीत लपला आहे. कस बर? कारण १९०३मध्ये जेंव्हा आपल्याकडे लोखंडी नांगर हे अत्याधुनिकतेचे प्रतीक मानले जात होते, त्यावेळी एका स्वतंत्र देशात, अमेरिकेत, दोन भाऊ, wilbur आणि orville wright हे पाहिलं विमान तयार करत होते. असो.

पुढे जाऊ.

१ ऑक्टोबर १९६४ला टोकियो ओलीम्पिकचा दरम्यान टोकियो आणि ओसाकामध्ये पहिली shinkansen, म्हणजे आपल्याला माहित असलेली बुलेट ट्रेन चालू झाली. आजपर्यंत, जपानमधील असंख्य बुलेट ट्रेन मध्ये गेल्या जवळ-जवळ ५० वर्षात १,००० कोटी लोकांना प्रवास घडवत ह्या सेवेचा एकही अपघात असा झाला नाही जिथे एका जीवाला सुद्धा हानी झाली असेल. आपण ह्यालाच ट्रॅक रेकॉर्ड म्हणायचं का, संग्राम? LOL

ऑलिंपिक वरुन आठवलं, १९६५मध्ये astroturf चा जन्म झाला. १९७६च्या montreal ऑलिंपिक मध्ये (म्हणजे हे ७०व्या दशकाचे बोलतोय) पहिल्यांदाच astroturf चा उपयोग केला गेला. त्या स्पर्धेतभारतीय हॉकी संघ हा १२ मधून सातव्या क्रमांकावर आला. जलद वेगाची हॉकी आपल्याला शिकायला खूपच वर्ष लागली.

वैद्यकीय क्षेत्रात सुद्धा एक महत्वाची घटना घडली, बरका? ०३ डिसेंबर १९६७ला डॉ Christiaan Barnard यांनी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या Denise Darvallच्या संपूर्ण हृदयचे Louis Washkansky ह्या एका ५४ वर्षीय माणसात प्रत्यारोपण केलं आणि जगाचा पहिला हार्ट ट्रान्सप्लांट केला.

जर विश्वाचा जन्म बिग बँग नि झाला असला तर, cosmic microwave background ह्ह्याचा अस्तित्वाची भविष्यवाणी १९४८मधेच Ralph Alpher आणि Robert Herman, आणि ह्यांचा PhD मार्गदर्शक George Gamow ह्यांनी केली होती. १९६४मध्ये Holmdel, New Jersey इथल्या Bell Labsमध्ये संशोधन करतांना Arno Penzias आणि Robert Wilson ह्या दोन वैज्ञानिकांना ह्या Cosmic microwave backgroundचा शोध लागला! ह्यामुळे विश्वाची उत्पत्ती हि big bang मुळेच झाली हेच आपल्याकडे विश्वनिर्मितीचे सर्वात विश्वासार्ह स्पष्टीकरण आहे हे सिद्ध झाले.

The Interplanetary Scintillation Array, किंवा IPS Array हा १९६७मध्ये तयार झालेला Cambridge, United Kingdom मधल्या Mullard Radio Astronomy Observatoryतला radio telescope आहे.

०६ ऑगस्ट १९६७ला इथल्या Jocelyn Bell, एक महिला वैज्ञानिकानी, जिचा हि दुर्बीण बाड़ण्हण्यामध्ये सुद्धा हाथ होता, तिला एका तार्यातून नियमित अंतरालात, म्हणजे दर १.३३ सेकंदांनी प्रकाश (म्हणजे रेडिओ लहरी) येतांना आढळला. तिच्या supervisor, Antony Hewishने ज्यांनी ती दुर्बीण विकसित केली होती, तिला सांगितलं कि हा एक प्रकारचा radio interference आहे, म्हणजे थोडक्यात के ह्याकड्डे दुर्लक्ष्य करावे. पण नंतर लखसायात आलं कि Jocelyn Bellने जगात पहिल्यांदाच pulsar किंवा pulsating star हा पहिला होता! pulsar हा पृथ्वीवरच्या atomic clocks पेक्षाही अचूक वेळेचं प्रमाण देतो आणि आजही आपण अशा ताऱयांना वेळ ठरवण्यासाठी वापरतो. आहे कि नाही गम्मत?

आणि आपण अंतराळ आणि खगोलशात्राबद्दल बोलतोय तर ६०ची सर्वात मोठ्या घटना तर विसरूच शकत नाही. १२ एप्रिल १९६१ला सोविएत रशियानी पहिलाच मनुष्य, युरी गागारीन, हा अंतराळात पाठवून सर्वांना आश्चर्यचकित केले. मे १९६१मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडीनीं घोषणा केली के १९६०चं दशक संपायच्या आत अमेरिका चंद्रावर मनुष्य उतरवेल! “I believe that this nation should commit itself to achieving the goal, before this decade is out, of landing a man on the Moon and returning him safely to the Earth.”

मग झाली चढाओढ सुरु. पहिल्या फेरीत सोविएत रशिया ने बढत घेतली. जुन १९६३ मध्ये पहिली महिला वॅलेंटिना तेरेश्कोव्हा अंतराळात गेली. १९६५-६६ मध्ये शुक्रावर (venus) एका Venera ३ च क्रॅश लँडिंग आणि ०३ फेब्रुवारी १९६६ला Luna ९ चंद्रावर अलगद उतरवून, आणि नंतर मार्च १९६६मध्ये लागेचच Luna १० हे अंतराळयान चंद्राच्या कक्षेत, म्हणजेच orbit मध्ये बसवून, आणि सप्टेंबर १९६८मध्ये तसेच चंद्राच्या कक्षेत Zond ५ ह्या अंतराळयानात दोन कासवं पाठवून सोविएत रशिया पुढे पुढे चालला होता. त्यात अमेरिकेच्या Apollo प्रकल्पात पहिल्याच Apollo यानामध्ये उड्डाणापूर्वीच्या चाचणीत आग लागून तीनही अंतराळवीर दगावल्या मुळे अमेरिकन space program ला एक मोठा धक्का बसला. पण जेंव्हा रशियाची कासवे चंद्राभोवती प्रदक्षिणा घालत होती, त्याच्या काही महिन्यातच, म्हणजे डिसेंबर १९६८मध्ये अम्रेरिकेने Apollo ८ मधून ३ अंतराळवीरांना चंद्राच्या कक्षेत पाठवले. आणि अखेर, २० जुलै १९६९ला, Apollo ११ मधून The Eagle नावाच्या चांद्रयानातून दोन मनुष्य (मी मुद्दाम अमेरिकन म्हणत नाही बरका यांना, पण दोन मनुष्य, पृथ्वीवर चालणारे मानव) Neil Armstrong आणि Buzz Aldrin ह्यांनी ६.५ करोड tv प्रेक्षांच्या साक्षिने Tranquility Base वर उतरवून चंद्राच्या मातीवर आपले पायाचे ठसे उमटलावले!

संग्राम, जर आपण बघितलं तर wright बंधू, orville आणि wilbur ह्यांच्या पहिल्या हवे-पेक्ष्या-जड वायुयानातून Kitty Hawk इथे १७ डिसेंबर १९०३ मध्ये १२ सेकंद ताशी ४३ km ने १२० फूट उंचीवर उडवून जी अवकाशयुगाजी सुरुवात केली होती, त्यात केवळ ६६ वर्ष्यात मनुष्य चंद्रावर जाऊन पोहोचला. म्हणजे जर तुझा जन्म १९०३च्या आधीच असता, तर तुझ्या एकट्या व्यक्तीच्या जीवकाळात तुला दोन्हीही घटनांबाबत वर्तमानपत्रात वाचायला मिळाले असते! काय विस्मयकारक विचार आहे ना?

अरे हो, एक गोष्ट सांगावीशी वाटे इथे: जसे Neil Armstrong चे “That’s one small step for man, one giant leap for mankind.” प्रचंड लोकप्रिय झालं तसाच एप्रिल १९८४मध्ये, म्हणजे १५ वर्ष्यातच पहिला भारतीय नागरिक, Sqn Ldr राकेश शर्मा हे जेंव्हा Soyuz T ११ मधून अंतराळात गेले आणि त्यांच्या २१ तास आणि चाळीस मिनिटात जेंव्हा ते त्याकाळच्या आपल्या पंतप्रधांनांशी म्हणजेच श्रीमती इंदिरा गांधींशी बोलले, तेंव्हा त्यांना श्रीमती गांधींनी विचारले कि वरून भारत कसा दिसतोय, तर त्यांनी इतके सुंदर उत्तर दिले कि ते आजही प्रत्येक भारतीयांच्या मनामध्ये घर करून बसले आहे: सारे जहां से अच्छा.

—————————————————

आता आपण जगात, भारतात, आणि महाराष्ट्राततल्या १९६०च्या दशकातल्या प्रमुख घडामोडीकडे वळूया, आणि ह्या, सहज समजून घेण्यासाठी, आणि वेळेच्या अभावामुळे (कारण हे दशक खूपच घटनापूर्ण आणि महत्वाचे असं ठरलं), आपण हा कालक्रमानुसार (म्हणजेच chronologically) बघू:

of course, ह्या ओघात बोलतांना काही गोष्टी कालक्रमानुसार नसतील, आणि काही राजकीय असतील, तर काही अराजकीय, काही वैज्ञानिक तर काही औद्योगिक. आपण फक्त एक आढावा घेत आहोत आणि आपल्याकडून ह्याआधीच्या प्रश्नांमध्ये काही गोष्टी ज्या राहिल्या होत्या, त्याबद्दल एक उल्लेखमात्र करायचा आहे. काहींच्या कथा अजून रोचक असल्या, तर त्यात अजून सखोल जाता येईल. चूक-भूल माफ असावी. समजून घे! ह्यावरून एक गम्मत लक्षात आली:

१९२८साली स्वामिनाथन सदानंदांनी एका राष्ट्रवादी वर्तमानपत्राची स्थापना केली: The Free Press Journal. त्या वृत्तपत्राने भारतीय स्वातंत्र्यचळवळीला भरपूर योगदान दिलेच, पण स्वतंत्र भारताला उत्कृष्ट असे व्यंगचित्रकार घडवून दिले. Keshav Shankar Pillai, अर्थात Shankar ह्यांच्या कारकीर्दीतला सुरुवातीचा ‘break’ The Free Press Journal ने दिला. पुढे जाऊन त्यांनी स्वःताचे साप्ताहिक Shankar’s Weekly हे १९४८ ते १९७५ चालवले. त्याला भारताचे Punch असेही म्हणतात. त्यांचा ह्या साप्ताहिकाचे उद्घाटन पंडित जवाहरलाल नेहरूंनी केले, तरीही Shankar ने नेहरूंवर असंख्य व्यंगचित्रे प्रकाशित केली आणि त्यांची आणि त्यांच्या धोरणांची आणि विचारांची खूप खिल्ली उडविली. नेहरुंच्या मृत्यूच्या १० दिवस अगोदरच्या प्रकाशित केल्या गेलेल्या साप्ताहिकात तर त्यांनी चक्क नेहरूंच्या वयाची टर उडविली. त्यांना नेहरूंनी निरोप पाठविला, ‘Don’t spare me, Shankar’. भारतात त्यावेळचे राजनेता आणि लोकशाही हि अशी होती. असो. हे मी तुला का सांगतोय, संग्राम? कारण The Free Press Journal ने अजून दोन उत्तम व्यंगचित्रकार आपल्याला दिले. पहिला होता R K Laxman, जे अवघे २० वर्षाचे असतांना इथे नोकरीला लागले, पण नंतर कॉम्म्युनिस्टांची खिल्ली उडवायची नाही असं सांगण्यात आल्यावर, नोकरी सोडून The Times of India मध्ये लागले, जिथे त्यांनी The Common Man ला जन्म दिला. आणि दुसरे ३४ वर्षीय व्यंगचित्रकार असेच ज्यांच्या व्यंगचित्राबद्दल आक्षेप घेतला जाण्यामुळे, तीथून बाहेर निघून ज्यांनी आपले मासिक काढले, आणि ज्या गोष्टीचे महाराष्ट्राच्या राजनीतीवर दूरवर परिणाम झाले. ते चित्रकार म्हणजे बाळ केशव ठाकरे ज्यांनी १३ ऑगस्ट १९६० ला मार्मिक नावाच्या मासिकाचे यशवंतराव चव्हाणांच्या हस्ते उदघाटन केले. ह्याच मासिकातून ०५ जून १९६६ला शिव सेनेच्या स्थापनेची घोषणा करण्यात आली, आणि १९८८ मध्ये ‘सामना’ दैनिक येईपर्यंत, हे शिव सेनेचे मुखपत्र राहिले.

१९६०च्या दशकात बऱ्याच राष्ट्रीय संस्था स्थापण्यात आल्या: National Co-operative Development Corporation, Unit Trust of India, Food Corporation of India, Post-Graduate Institute of Medical Education and Research, Jawaharlal Nehru University, Public Provident Fund, Border Security Force, Central Industrial Security Force, State Agricultural Credit Corporation.

आणि बरेच महत्वाचे कायदे बनविण्यात आले:
Geneva Conventions Act
Criminal Law Amendment Act
Advocates Act
Motor Transport Workers Act
Sugar (Regulation of Production) Act
Institutes of Technology Act
Land Acquisition (Amendment) Act
Atomic Energy Act
Extradition Act
Foreigners Law (Application and Amendment) Act
Customs Act
Warehousing Corporations Act
Marine Insurance Act
Official Languages Act
Government of Union Territories Act
Compulsory Deposit Scheme Act
Export (Quality Control and Inspection) Act
Major Port Trusts Act
Administrators-General Act
Central Boards of Revenue Act
Payment of Bonus Act
Asian Development Bank Act
Police Forces (Restriction of Rights) Act
Seeds Act
Passports Act
Anti-Corruption Laws (Amendment) Act
Civil Defence Act
Enemy Property Act
The Gold (Control) Act, 1968
Insecticides Act
Judges (Inquiry) Act
Central Sales Tax (Amendment) Act
Foreign Marriage Act
Criminal and Election Laws Amendment Act
Oaths Act
Monopolies and Restrictive Trade Practices Act
अशे १२१ कायदे आणि १५ घटनादुरुस्त्या (म्हणजे ८वि ते १२वि amendment) ह्या १९६०च्या दशकात करण्यात आल्या.

१३ सप्टेंबर १९६१ला भारतीय राष्ट्रपतींनी Income Tax Act ला मान्यता दिली. हा ०१ एप्रिल १९६२पासून अमलात आणला गेला. तुला माहित आहे का संग्राम, हा Act दर वर्षी amend केला जातो. म्हणजे ह्यात दुरुस्ती होते, कारण बजेट मध्ये करांमध्ये काहीही बदल घडला तर ह्या कायद्यामध्ये बदल घडवणे भाग आहे. म्हणजे दर वर्षीच्या Finance Bill ह्यात Income Tax Act amend करण्याची तरतूद आपसूक आहे!

संग्राम, तुला काय वाटतं, स्त्री-स्वातंत्र्याच्या बाबतीत आपण इतर प्रगत देशांच्या तुलनेत कुठे बसतो? म्हणजे अमेरिकेत आणि ब्रिटन मध्ये तर स्त्रियांबद्दल आणि त्यांच्या हाकांबद्दल बरेच कायदे आपल्या अगोदर झाले असणार, ना? ऐक मग:
१२ डिसेंबर १९६१ला The Maternity Benefit Act हा अमलात आणला गेला. ह्यात नवीन आईला ६ आठवड्यांची सुट्टी हि नमूद होती. त्यात नुसतं जीवित बाळाच्या आईला नव्हे तर प्रसूती झालेल्या कुठल्याही बाईला, अगदी जिचे बाळ जगले नसले तरी! हा किती प्रगत कायदा होता माहित आहे का तुला? अरे ब्रिटन मध्ये असा कायदा १९७५ मध्ये तर अमेरिकेत तर चाक १९९३ मध्ये हा आला! त्याअगोदर, त्याच वर्षी, २० मे ला, आपण Dowry Prohibition Act सुद्धा लागू केला होता. आपल्या देशाचे तेव्हाचे राजकर्ते आणि सांसद किती प्रगतिशील होते ह्याची ह्यातून कल्पना येईल. The Maternity Benefit Act ची एक गम्मत सांगतो तुला. प्रसूती झालेल्या महिला कामगारांना सुट्टी मिळावी हे काही १९६१मध्ये आपल्याला उमजलं नाही, बरा का? पार १९२९मध्ये, नारायण मल्हार जोशी, गोपाळ कृष्ण गोखल्यांचे अनुयायी, ह्यांनी तेंव्हाच्या central legislature मध्ये हे विधेयक सादर केलं होतं. ह्यांनीच, म्हणजे NM जोशींनीच लाला लजपत राय ह्यांसोबत १९२०मध्ये All India Trade Union Congress ची स्थापना केली होती. आहे कि नाही तेंव्हाच्या आपल्या देशाच्या आणि समाजाच्या नेत्यांची कमाल?

अशाच पुरोगामीवादाचा अजून एक पुरावा म्हणजे १९६०चा Prevention of Cruelty to Animals Act. अमेरिकेतसुद्धा एक कायदा असा जो कि सर्व देशात लागू होईल, हा २०१९ माधेयच आला! त्याआधी फक्त प्रत्येक राज्याचे वेगळे कायदे होते. खरंच, संग्राम, आपण भारतीय लोक किती नशीबवान होतो कि आपल्याला नेहरू, पटेल, आंबेडकर, आझाद, गाडगीळ, कृपलानी, राजेंद्र प्रसाद, शास्त्री, इंदिरा गांधी, कामराज, आणि राव, ह्यांसारखे असंख्य प्रगतिशील आणि दूरदर्शी नेते बरोबर वेळेला लाभले!

१९६२ आणि ६७मध्ये निवडणुका झाल्या. संग्राम, त्यावेळीस काँग्रेसची पकड इतकी घट्ट होती, मुख्यतः नेहरूंच्या प्रचंड व्यक्तिमत्वामुळे, आणि नंतर इंदिरा गांधींच्या नेतृत्वाच्या शैलीमुळे, कि आज आपण जे ३०० लोक सभा सीट जिंकणार्याला आपण ‘Monarch of all they survey’ म्हणतो, तुला माहीत आहे का १९५७ च्या निवडणूकात किती सीट काँग्रेसला मिळाल्या? ३७१. आणि १९६२च्या निवडणुकीत? ३६१. परंतु ह्यावर काँग्रेसचं नियंत्रण हळू-हळू सुटायला लागलं आणि १६७च्या निवडणुकीत, सत्ताधारी पक्ष्याला अवघ्या २८३ जागा मिळाल्या.

१७ ते १९ डिसेंबर १९६१ च्या दरम्यान गोआ मुक्ती संग्राम झाला (ज्याला आपण operation vijay असं नाव दिले होत). पोर्तुगीज हे भारतात पहिलेच यूरोपीय लोक होते ज्यांनी इसवी सन १५०५ मध्ये Quilon म्हणजेच आजचे केरळमधलं कोल्लम इथे पहिली फॅक्टरी टाकली होती. तब्बल ४५६ वर्षानंतर भारताचा भूमीवर एकही यूरोपीय सत्तेचे राज्य नव्हते. ह्याअगोदर पोर्तुगीज दमण आणि नगर हवेली हे ऑगस्ट १९५४मध्येच स्वतंत्र झाले होते. एक गम्मत सांगतो: दादरा नगर हवेली स्वतंत्र झाल्यानंतर एकाच दिवसासाठी त्याचे पंतप्रधान KG Badlani, हे एक IAS officer होते, आणि त्यांनी भारतामध्ये प्रवेशाचा करारावर ११ ऑगस्ट १९६१ला सही केली. आहे कि नाही मजा?

१३ फेब्रुवारी १९६०ला फ्रान्स अणुबॉम्ब चाचणी करून ३ अण्वस्त्र बाळगणाऱ्या देशामध्ये सामील झाला. आता अणुबॉम्ब-सज्ज अश्या देशांमध्ये USA UK USSR ची France ची भर पडली. नंतर, १६ ऑक्टोबर १९६४ला चीनने सुद्धा ह्या चमूमध्ये आपल्या हक्काची जागा मिळवली. त्यावेळीस अमेरीकेने तैवानला आश्वासन दिले कि चिनी हल्ल्यापासून त्यांचं रक्षण (आणि जरुर पडल्यास प्रतिहल्ला सुद्धा) हि अमेरिकेची जबाबदारी आहे आणि त्यांना, म्हणजेच तैवानला स्वःतःची अणुचाचणी करण्यापासून परावृत्त केले. चीनच्या ह्या अणुचाचणी नंतर भारताचा nuclear program जो थंडावला होता, त्याला गती आली. पण शास्त्रींनीं भाभांच्या ऐवजी साराभाईंना त्याची कमान दिली होती, आणि साराभाई हे गांधीवादी शांतीप्रिय असल्यामुळे बॉम्ब चे काम रखडले होते. पण नंतर, इंदिरा गांधींनी त्याला परत गती दिली आणि १९७४मध्ये बुद्धानी स्मितहास्य केले. भारत चीन, फ्रान्स, UK , USSR , आणि USA बरोबर त्या विशेष exclusive club चा सदस्य झाला.

नंतर, १५ ऑगस्ट १९६९ला, विक्रम साराभाईंच्या अथक परिश्रमांमुळे जवाहरलाल नेहरूंनी Department of Atomic Energy (DAE) च्या अधिपत्याखाली जी Indian National Committee for Space Research (INCOSPAR) १९६२मध्ये स्थापित केली होती, त्याच रूपांतर Indian Space Research Organisation, म्हणजेच ISRO मध्ये झालं.

५ फेब्रुवारी १९६०ला geneve switzerland येथे CERN म्हणजेच Conseil Européen pour la Recherche Nucléaire, म्हणजेच यूरोपीय अणू संशोधन संघटना, ह्यांचा पहिला particle accelerator हा सुरु झाला. पुढे, ह्याच संस्थेने बांधलेल्या LHC म्हणजेच Large Hadron Colliderमध्येच ४ जुलै २०१२ला Higgs Boson, ज्याला the God particle असं पण म्हटले जाते, पहिल्यांदाच पाहण्यात आला.

ऑक्टोबर १९६३मध्ये सतलज नदीवर एक बलाढ्य अश्या बांधाचं पंडित नेहरूंद्वारे उदघाटन करण्या आलं. त्या बांधाचं नाव होत भाक्रा नांगल, जिथे त्यांनी त्यांचे त्याकाळचे गाजलेले ‘temples of modern india’ भाषण केले, ज्याच्यात त्यांनी असे म्हंटले ‘This dam has been built with the unrelenting toil of man for the benefit of mankind and therefore is worthy of worship. May you call it a temple or a gurdwara or a mosque, it inspires our admiration and reverence.’ ह्या बांधावर काम १९४८मध्येच चालू झाले होते आणि जगभरची विकसनशील राष्ट्र, जी नुकतीच स्वतंत्र झाली होती, ह्याकडे नजर लावून बसली होती. उदाहरणार्थ, जेंव्हा इजिप्तमध्ये नासिर हे १९५४मध्ये सत्तेवर आले, त्यांना इजिप्तची प्रगती साठी नाईल नदीवर अशाच एका बांधाची गरज आहे, ह्या विचाराने इतके पछाडले कि, जेव्हा त्यांना युरोपियन देशांनी पैसे देण्यास नाकारले, त्यांनी सुएझचा कालव्याचे २६ जुलै १९५६ला राष्ट्रीयकरण केले आणि चक्क ब्रिटन आणि फ्रान्सबरोबर युद्ध ओढवून घेतले. गम्मत म्हणजे, ह्या नाईल वरच्या ‘अस्वान’ नावाच्या बांधाचे काम ०९ जानेवारी १९६०ला सुरु केले गेले. म्हणजे तेसुद्धा ६०च्याच दशकात!

११ मे १९६३ला Official Languages Act हा कायदा आला. घटनेच्या Part १७ प्रमाणे इंग्रजी हि भाषा हळू-हळू कमी करून हिंदी हि राष्ट्राची राजभाषा २६ जणूएअरी १९६५पर्यंत करायची तरतूद होती. हि तारीख जशी जवळ येऊ लागली, तशी दक्षिणेकडची राज्ये, ज्यांना आपल्या प्राचीन भाषा आणि साहित्याचा अभिमान होता (आणि तो असलाच पाहिजे) तिथे आंदोलने चालू झाली. डांगे, जाळपोळ, मारामारी, पोलीस गोळीबार असे अनेक खेदजनक प्रकार घडले. काही ठिकाणी तर भारत गणराज्यातून वेगळे होऊन द्रविड नाडूची स्थापना करण्याचे ठराव करण्यात आले. त्यानंतर भारतीय राजघटनेची १६वि दुरुस्ती करून अलगाववादी विधाने करणे किंवा इच्छा प्रकट करणे ह्यावर बंदी लावण्यात आली, आणि मग हि आग काही शांत झाली. पण काही वर्षयांसाठीच. नेहरूंच्या मृत्यूनंतर, गुलझारीलाल नंदा व मोरारजी देसाईंनी पुन्हा हिंदी लादण्याचा प्रयत्न केला पण पुन्हा त्याचे पडसाद दक्षिणेकडे इतके तीव्र उठले कि त्यांनी प्रजासत्ताक दिन, म्हंजे २६ जानेवारी ला काळा दिवस घोषित केला आणि लाल बहादूर शास्त्रींना आकाशवाणीवर भाषण द्यायला लागलं कि नेहरूंनी दिलेलाच शब्द, कि इंग्रजी हि सुद्धा सदा वापरात राहील, हा पाळला जाईल. ०८ जनुकारी १९६८ला Official Languages Actमध्ये सुधारणा केली गेली के इंग्रजी हि राजभाषा सदोदित राहील आणि मग कुठे हे प्रकरण निवळले.

———————————

अमेरिकेचे एप्रिल १९६१ची सोविएत रशियाचा मित्र देश, कोम्मुनिस्ट cubaवर Bay of Pigs ची धाड अपयशी ठरून अमेरिकन सरकार तोंडघशी पडलं होत. १९५८ आणि १९५९मध्येच अमेरिकेनं इटली मध्ये ३० आणि टर्की मध्ये १५ अणुबॉम्ब-सशस्त्र क्षेपणास्त्र हि तैनात केली होती आणि सोविएत रशियाच्या अगदी दाराशी आपलं सैन्य आणून ठेवलं होत. ह्याचे परिणाम असे झाले ख्रुसचेव आणि कॅस्ट्रो जुलै १९६२मध्ये भेटले तेंव्हा cuba मध्ये अणुबॉम्ब-सुसज्जित क्षेपणास्त्र तैनात करायची हा निर्णय झाला. तशी तयारी cuba मध्ये चालू झाली. missile silos, म्हणजेच क्षेपणास्त्रे ठेवण्यासाठी आणि प्रक्षेपणाची खोल निमुळते खड्डे तयार करणे वगैरे कामाला वेग आला. त्याच वेळीस अमेरिकन गुप्तहेर खात्याने त्यांच्या हवेतून चित्र घेणाऱ्या U-२ विमानाने काढलेल्या फोटोवरून हे ओळखले आणि राष्ट्रपतींना, म्हणजेच जॉन एफ केनेडींना सावध केले. केनेडींनी cuba वर हल्ला करायला नकार दिला, पण cuba भोवती समुद्रमार्गे येणार्या सर्व वाहतुकीची कोंडी करायचे आदेश दिले. १६ ते १९ ऑक्टोबर १९६२ मध्ये चाललेल्या ह्या कोंडीचे, आणि त्यावर सोविएत रशिया च्या प्रतिसादाचे आणि त्यामुळे जगावर आलेल्या अणुयुद्धाच्या संकटाचेच नाव नंतर Cuban Missile Crisis असे पडले. ह्या संकटाचे निवारण सोविएत रशिया ची cuba वरून माघार आणि अमेरिकेची टर्की वरून असं झाले.

२० ऑक्टोबर १९६२ला सोविएत रशिया, भारताचा मित्र हा दुसरीकडे गुरफटला आहे हे बघून, चिनी लाल सेनेने २,००० मैल लांबीच्या भारत-चीन सऱ्हाडीवर हल्ला चढवला, लदाख ते पार NEFA (म्हणजेच North-East Frontier Agency, जिचे १९७२ साली अरुणाचल आणि आसाम मध्ये रूपांतर झाले) पर्यंत. चिनी लाल सैन्याच्या तुलनेत भारतीय सैन्याकडे मनुष्यबळ, रसद, दारू-गोळा कमी होतीच, पण भारतीय सैन्याधिकाऱ्यांकडे चिनी सैन्येच्या तयारीचे उत्तर नव्हते. चीन ने हे युद्ध काही वर्षांपासून ठवोन, सराव करून, नियोजन करून सुरु केले होते. भारताची काहीच तयारी नव्हती. सगळीकडे पीछेहाट झाली, परंतु आपले सैनिक अत्यंत चिकाटीनं, शूरवीरते नि, आणि कौशल्याने लढले. परंतु, शकुनीच्या फाश्यांसारखे सगळे डाव आपल्याविरुद्धच होते आणि जेंव्हा २१ नोव्हेंबर ला चिनी सेनेने एकतर्फा युध्दविरामाची नघोषणा केली, तोपर्यंत चीनने aksai chin आणि NEFA चे काही भागात आपला काबीज पक्का केला होता. ह्यामुळे भारताची सैनिकी हार झाली असेल तरी चीनने सोविएत रशिया आणि अमेरिकेच्या मैत्रीला मुकले. गम्मत सांगतो संग्राम, पाकिस्तानचे तेंव्हाचे राष्ट्राध्यक्ष, जेनेरल अयुब खान ने भारतीय सैन्याला पाकिस्तान-व्याप्त काश्मीर मधून चिनी हद्दीपर्यंत जायला आमंत्रण दिले होते. नंतर मात्र पाकिस्तान हा चीनच्या चमूत पूर्णपणे गेला. ह्या युद्धामधील पराभवामुळे नेहरूंची तब्ब्येत ढासळली आणि २७ मे २९६४ला वयाच्या ७४व्या वर्षी नेहरूंनी कायमचा निरोप घेतला.

त्यांच्या अंत्ययात्रेला १५ लाख लोकं दिल्लीला देशभरातून आले. लोक स्वतःला पोरकं समजु लागले. देशभर दुःख्खाची कळा पसरली. बर्याच लोकांना, अगदी मोठ्या मोठ्या इतिहासकारांना सुद्धा वाटले कि आता भारताचे तुकडे होणार. पुढे काय, आणि पुढे कोण, हा मोठा प्रश्न होता. काही दिवसांसाठी गुलझारीलाल नंदांनी पंतप्रधानपद सांभाळले आणि मग लाल बहादूर शास्त्रींची निवड करण्यात आली. ०९ जून १९६४ला शपथविधी होऊन भारताचा नवीन पंतप्रधान एका गरीब शेतकऱ्याचा मुलगा आणि प्रखर गांधीवादी, सदरा-धोतर नसणारा, ५ फूट २ इंच उंचीचा असा हा साधा माणूस होता.

जगाला, आणि पाकिस्तानच्या अयुब खानला हि व्यक्ती अगदीच साधी-भोळी आणि नेहरूंच्या विशाल अश्या व्यक्तिमत्वापुढे अगदीच ठेंगू वाटली असेल. कारण ऑगस्ट १९६५मध्ये त्यांनी एक अफाट महत्वाकांक्षी योजनेला चालना दिली: Operation Gibraltar. ह्यानंतरचा इतिहास खूपच रोचक आणि रोमांचकारक आहे. Gibraltar चे अपयश, त्यानंतरचे पाकिस्तानचे Operation Grand Slam, त्यातही अपयश, भारतीय वायू सेनेचे प्रतिहल्ले आणि पाकिस्तानी रणगाडे, जे भारतीय रणगाड्यांपेक्षा आधुनिक होते, त्यांची असल उत्तर (इंग्रजीत Fitting Response) च्या लढाईत धूळधाण (९७ पाकिस्तानी पॅटन रणगाडे उध्वस्त फक्त ३२ भारतीय रणगाड्यांच्या बदल्यात), आणि त्यानंतर ०६ सेप्टेंबरला भारतीय सेनेचे पाकिस्तानात घुसणे, बुरकीचे युद्ध, पाकिस्तानच्या PNS गाझी च्या गोष्टी, आणि भारतीय सेनेचे लाहोर विमानतळाच्या हाकेच्या अंतरावर येणे हा एक वेगळा कार्यक्रम करता येईल. थोडक्यात म्हणायचं तर शास्त्रींच्या नेतृत्वाखाली भारताने पाकिस्तानच्या छुप्या वाराला चोख प्रत्युत्तर दिले. अयुबीचे सगळे अंदाज चुकले. शेवटी युनाइटेड नेशन्स च्या माध्यमातून अमेरिकेची आणि सोविएत रशियाची मध्यस्थी स्वीकारून अयुब खानने तह पत्करला. ताशकांत मध्ये शास्त्री आणि अयुब भेटले आणि १० जानेवारी १९६६ला ताशकांत करारावर सह्या झाल्या. ११ जानेवारीला शास्त्रीजींच्या संशयास्पद अश्या अवस्थेत मृत्यू झाला, ज्याचं कारण आजही गुप्त आहे.

१९६०च्या दशकात २२ नोव्हेंबर १९६३ला जॉन एफ केनेडींची एकट्या बंदूकधारीनी २५० फुटाच्या पेक्ष्या जास्त दुरीवरून ३ गोळ्या चालवून हत्या केली, ४ एप्रिल १९६८ला मार्टिन लुथर किंग जुनिअर ची गोळ्या घालून हत्या, आणि शास्त्रींच्या संशयास्पद मृत्यू नंतर निव्वळ १३ दिवसात भारतीय अणुबॉम्ब शास्त्रज्ञ होमी भाभांचा स्विस आल्प्स मध्ये आकस्मिक विमान अपघातात मृत्यू हे सर्व ह्या दशकाला एक काटकारस्थानाची छटा देऊन जातात.

२४ जानेवारी १९६६ला श्रीमती इंदिरा गांधी ह्यांनी भारताच्या पंतप्रधानपदाची शप्पथ घेतली, आणि भारताच्या इतिहासात एक नवीन पर्व चालू केले.

भारत बदलत होता. आणि जगही झपाट्यानं वेगळे दिसत होतं.

<End 1960s Notes>

Did you like what you read? Share it with friends.

You may also like

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in Art